तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे आणि अॅक्टीव्हा जप्त: शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा येथे काळ्या रंगाच्या विनानंबर अॅक्टीव्हा गाडीवर थांबलेल्या दोन संशयित युवकांकडून शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे आणि एक अॅक्टीव्हा असा एकूण १ लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (दि. २९) ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.४५ वाजता पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा पाय आणखी खोलात…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्टॅण्ड बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा पुणे सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे. आरोपीने एका महिलेविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून, आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही परिस्थितीमध्ये कोणताही बदल झाला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. त्यानंतर आता दत्ता गाडे याच्या अडचणी वाढल्या असून या प्रकरणात पाय आणखी खोलात […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात धुमश्चक्री; पोलिसांच्या फायरिंगमध्ये आरोपी ठार

शिक्रापुर (तेजस फडके) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात आज शनिवार (दि ३०) रोजी सायंकाळी थरारक घटना घडली. एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलिस पथक अटक करायचा प्रयत्न असताना संशयित आरोपीने अचानक चाकू काढून पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला असुन त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार […]

अधिक वाचा..

विरार इमारतीच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू 

वसई: विरार इमारत दुर्घटनेत मागील वीस तासांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 17 जणांचा शोध लागला असून त्यात 14 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी झाले आहे. तर 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. मंगळवारी रात्री विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या […]

अधिक वाचा..

शिर्डीतील चार हॉटेल एक वर्षासाठी सील

अहिल्यानगर: हॉटेल्सवर देहविक्रीचा अवैध व्यवसाय चालविला जात असल्याचे समोर आले आहे. शिर्डीत देखील काही दिवसांपूर्वी हा प्रकार समोर आला होता. त्यानुसार शिर्डी शहरात वेश्या व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शहरातील चार हॉटेल्स एक वर्षासाठी सील करण्यात आले आहे. शिर्डीमध्ये काही दिवसांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी […]

अधिक वाचा..

‘तु आमच्या शेतातून रस्ता कसा काढतो, हे पाहतोच’ म्हणत शासकीय ठेकेदाराला मारहाण

पुणे: शासकीय रस्त्याचे काम करण्यासाठी गेलेल्या ठेकेदाराला ‘तु आमच्या शेतातून रस्ता कसा काढतो, हे पाहतोच’ असे म्हणत बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी वकिलासह दोघांवर बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 24 वर्षीय शासकीय ठेकेदाराने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अ‍ॅड. सारथी दिनेश पानसरे आणि मयुर […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवाला कोकणात जाण्यापूर्वीच भोजने कुटुंबावर काळाचा घाला

कोल्हापूर: कळंबा कारागृहाजवळ एलआयसी कॉलनीत राहणारे अमर भोजने यांची आई चार दिवसांपूर्वीच गणेशोत्सवाच्या तयारीसाठी कोकणातील मूळ गावी देवरुखला गेल्या. विघ्नहर्त्या गणपती बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती.मंगळवारी ते पत्नी, मुले आणि वडिलांना घेऊन गावाकडे जाणार होते. तत्पूर्वीच काळाने घातला आणि घरगुती गॅसच्या स्फोटात भोजने कुटुंबीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. अमर भोजने हे मूळचे कोकणातील देवरुखचे. दहा […]

अधिक वाचा..

पुण्यात कामगाराने केली हॉटेल मालकाची हत्या

पुणे: कोंढवे धावडे येथील हाॅटेलमध्ये किरकोळ वादातून कामगाराने हाॅटेल मालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पीकॉक फॅमिली गार्डन बार अँड लॉजिंग येथे मंगळवारी (दि. 26) रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी कामगार उमेश दिलीप गिरी (वय ३९, रा. […]

अधिक वाचा..

पैश्यासाठी खून! शिरूर पोलिसांची केली काही तासात गुन्ह्याची उकल, दोघे आरोपी जेरबंद

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथे उसने घेतलेले पैसे मागितले म्हणूण आरोपींनी उसाच्या शेतात खून करून मृतदेह लपविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या चार दिवसांत शिरूर पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय ५०) यांच्या खुनाचा तपास काही तासांत वेगाने उलगडत आरोपींपर्यंत पोहोचत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली […]

अधिक वाचा..

स्कॉर्पिओसह दोन गाड्या दिल्या तरी मन नाही भरल; ३६ लाखांच्या हुंड्यासाठी सासरच्यांनी तीला जिवंत जाळल

ग्रेटर नोएडा: लग्नानंतर आठ वर्ष हुंड्यासाठी छळ करून अखेर एका २६ वर्षीय विवाहितेची तिच्या पतीने आणि सासरच्यांनी मिळून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना ग्रेटर नोएडातील सिरसा गावात घडली आहे. पीडितेला जिवंत जाळण्यात आले. गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत काही तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती विपिन याला अटक केली आहे, […]

अधिक वाचा..