शिरुर तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतीय युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील एका गावातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवत स्वतःच्या चारचाकीतुन टाकवे (ता.मावळ, जि.पुणे) येथे घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे सोनाई मंडल (रा.पश्चिम बंगाल सध्या रा. टाकवे ता. मावळ जि.पुणे) या परप्रांतीय आरोपीवर बाललैंगिक अत्याचार (पोस्को) तसेच बलात्काराचा […]

अधिक वाचा..

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कारवाईत ३ आरोपींकडुन २ गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुस जप्त

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या इतर २ साथीदारांकडे गावठी पिस्टल असल्याची माहीती शिकापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली होती. त्याबाबत खातरजमा करुन पोलिस पथकाने तीन जणांना याप्रकरणी अटक करुन त्यांच्याकडुन २ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत […]

अधिक वाचा..

शिरुर येथे पुणे-नगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू तर मुलगा जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील पुणे-नगर हायवेवर हॉटेल राजनंदिनी समोर अज्ञात वाहणाने दुचाकीला धडकेत प्रमिला देवराव राठोड (वय ४४) या महिलेचा मृत्यू झाला असुन त्यांचा मुलगा राम देवराव राठोड (रा.चिखलीतांडा, ता किनवट, जि.नांदेड) सध्या रा. हिंजवडी चौक पुणे हा जखमी झाला आहे. याबाबत राम देवराव राठोड यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्यातील दोन वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला केली अटक

शिरुर (तेजस फडके) दोन वर्षांपुर्वी कोंबड्या घेवुन जाणाऱ्या टेम्पोवर आठ जणांनी दरोडा टाकत दरोडयामधुन मिळालेल्या कोंबडयापैकी १२४० कोंबड्यांची विक्री करुन सदर विक्रीतुन आलेली रक्कम आरोपीनी वाटुन घेतली होती. तसेच हा गुन्हा घडल्यापासुन आरोपी प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे (रा. करंजेनगर, शिकापुर ता. शिरुर, जि.पुणे) हा फरार होता. त्याचा शोध घेत असताना शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे […]

अधिक वाचा..

घोड धरणातुन बेकायदेशीर वाळु उपसा सुरुच; प्रशासन हतबल…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणातुन महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळूमाफिया बेसुमार वाळू उपसा करत असुन हे वाळू माफिया प्रशासनालाही जुमानत नसल्याने महसूल व पोलिस प्रशासन अक्षरशः हतबल झाल्याचे चित्र शिरुर तालुक्यात पहायला मिळत आहे. सध्या विधानसभा तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुका जवळ आल्याने […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका डॉट कॉम व रामलिंग महिला उन्नती च्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आपल्याकडे गौरी, गणपती, नवरात्री हे उत्सव अशा विविध प्रकारचे धार्मिक उत्सव साजरे केले जातात. त्यात पुर्वी अनेकवेळा प्लास्टिक, थर्माकॉल आणि इतर वस्तु आपण सजावटीला वापरायचो. परंतु सध्या पर्यावरणपुरक उत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. आता आपण शाडूच्या मातीपासुन गणपती किंवा पर्यावरणपुरक विघटित होणारा कचरा यापासुन सजावट करण्याकडे सध्या लोकांचा कल वाढला […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची पहिले जनसुनवाई मगच कारवाई…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचा पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी चार्ज घेताच शिरूर शहरातील रोड रोमिओ व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस वाहतुक शाखेमार्फत वीस दिवसातच तब्बल ४ लाख ५१ हजारांचा दंड वसुल केला आहे. यात १७ बुलेटस्वारांवर सायलेन्सर (फटाके फोडणे) कारवाई केली असून १७ हजार रूपयांचा दंड वसुल केला आहे. […]

अधिक वाचा..
crime

शिरुर; कोर्टातली केस मागे घे म्हणतं तडीपार गुंडाची भावकीतील एकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे जुन्या तक्रारीचा राग व जमीनी मध्ये रस्ता मागण्यासाठी केलेला अर्ज या कारणावरुन चिडुन जाऊन वडीलांच्या सांगण्यावरुन एका तडीपार गुंडाने स्वतःच्या भावकीतील एका व्यक्तीस हाताने तसेच लाथा, बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करत जखमी करुन घरात घुसून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नामदेव कांतीलाल भोरडे […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पुजा व आरती करुन अनोखे आंदोलन

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातुन जाणाऱ्या पुणे-नगर या मुख्य रस्त्यावर पाबळफाटा ते पाषाणमळा या भागात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असुन खड्डे पडलेले असल्याने शिरुर नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने पाबळफाटा येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पुजा व आरती करून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सावळेराम आवारी, शिरुर शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

MEPL च्या विरोधात खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याप्रमाणे विधानसभेत आवाज उठवणार; अ‍ॅड अशोक पवार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहती मधील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड (MEPL) या कंपनी विरोधात निमगाव भोगी ग्रामस्थांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर लोकसभेमध्ये संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांनी ज्या पद्धतीने आवाज उठवला. तसाच आवाज विधानसभेतही उठवणार असल्याचे प्रतिपादन आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी केले. निमगाव भोगी व परिसरात MEPL कंपनीच्या दुषित पाण्यामुळे […]

अधिक वाचा..