शिरुर-हवेली विधानसभा समन्वय पदाची माऊली कटके यांच्यावर जबाबदारी

मुंबईत ‘शिवसेना उद्धव गटा’च्या विशेष बैठकीत सर्वानुमते निवड शिरुर (अरुणकुमार मोटे) लोकसभा तसेच विधानसभा सन 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने जोरदार तयारी केली आहे. दोन्ही निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी संघटनात्मक बांधणी आणि नवी रचना करीत शवसेना ठाकरे गटाचे विभागीय नेते जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये खासदार संजय राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र आणि […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई परिसरात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. दोन दिवसांपुर्वी कान्हुर मेसाई, मिडगुलवाडी, खैरेनगर, खैरेमळा, चिंचोली, शास्ताबाद येथे अवकाळी पावसाने कांदा पिकामध्ये पाणी साठल्याने कांदा पिकाच्या मुळ्या सडल्याने मर रोग होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या हक्काच्या पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असुन तातडीने पंचनामे करुन […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीसह अवकाळी पाऊस

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यासह बेट भागातील सविंदणे, कवठे येमाई, मलठण, चांडोह, फाकटे, जांबूत, माळवाडी, टाकळी हाजी, आमदाबाद, शरदवाडी या परिसरात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली असून शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली आहे. या अवकाळी गारपीटीमुळे ऊस, बटाटा,कांदा,मका, ज्वारी, डाळींब, गहू आदी पिके भुईसपाट झाली असुन यावेळी सविंदणे सह अनेक गावात शेतामध्ये, रस्त्यावर गारांचा खच […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव गणपती येथे उसाची ट्रॉली उलटली

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी 9:30 च्या दरम्यान पुणे-नगर महामार्गावर अथर्व हॉस्पिटलच्या नजीक उसाची ट्रॉली पलटी झाली. उसाची ट्रॉली पलटी झाल्यानंतर पुणे-नगर महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊस अस्ताव्यस्त पडल्याने विरुद्ध बाजुच्या रस्त्याने दुचाकीवरुन चाललेला एक व्यक्ती घररुन पडला. परंतु पाठीमागुन आलेल्या एका एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच ब्रेक दाबल्याने […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाळूच्या पैशाच्या वादातुन दोन ठेकेदारांमध्ये तुंबळ हाणामारी

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील वाळू डेपोत पैशाच्या तसेच वाळू जास्त दराने विकत असल्याच्या वादातुन वाळू वाहतुक करणाऱ्या दोन ठेकेदारांमध्ये शुक्रवारी रात्री तुंबळ हाणामारी झाली असुन त्यातील एका ठेकेदाराने दुसऱ्या ठेकेदाराला बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात वाळूच्या ठेक्यावरुन जीवघेणी स्पर्धा सुरु होण्याची चिन्ह असुन भविष्यात शिरुर तालुक्यात कायदा आणि सुव्यस्था बिघडण्याची […]

अधिक वाचा..

सावधान; शिरुर तालुक्यातील खोली मालकांनो तुमचा भाडेकरु काही गैरप्रकार तर करत नाही ना…?

शिरुर (तेजस फडके) पुण्यातील उरुळी देवाची इथं एका भाडेकरुने मालकाने हॉर्न वाजवून झोपमोड केल्याच्या रागातुन खोली मालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून त्याची हत्या केली. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली असुन शिरुर तालुक्यातही शिक्रापुर, रांजणगाव, कारेगाव या गावात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत काम करणारी अनेक गुंड प्रवृत्तीची लोक भाड्याच्या खोलीत राहत असुन घरमालकांनी खोल्या भाड्याने देताना त्यांची सखोल […]

अधिक वाचा..

दुधाला भाव नाही…काढलेले कर्ज फिटणार कसे…? दूध उत्पादक युवक हताश

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसायाकडे वळाले. मध्यंतरी काही दिवसांपुर्वी दुधाच्या वाढलेल्या दरामुळे बेरोजगार तरुण वर्गही मोठया प्रमाणात दूध व्यवसायाकडे वळाला आहे. मागील सोळा-सतरा महिन्यांपासून गाय व म्हशीच्या दूध दरात वाढ झाली होती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत होता. मात्र पुन्हा दुधाचे दर घसरण्यास […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भाडेकरुंची अद्ययावत माहिती नसल्याने गुन्हेगारीला मिळतेय बळ…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात मोठया प्रमाणात औद्योगिक वसाहत वाढली असुन कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापुर, कोंढापुरी, रांजणगाव, करडे या ठिकाणी लाखों कामगार काम करतात. परंतु ते ज्या गावात भाड्याने खोल्या घेऊन राहतात. त्या खोली मालकांकडे (काही अपवाद वगळता) भाडेकरुंची अद्ययावत माहितीच उपलब्ध नसल्याने गुन्हेगारीला बळ मिळत असुन रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी परिसरात अनेक गुंड […]

अधिक वाचा..
shirur crime

न्हावरा-केडगाव रस्त्यावर टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटली; दोघांना अटक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): एका हॉटेलमध्ये कामगाराने काम करण्यासाठी आगावू रक्कम घेतली होती. पैसे घेऊनही तो काम करत नसल्याने हॉटेल चालवणाऱ्या दोघांनी मारहाण करून त्याचा खून केला होता. मृतदेह न्हावरा-केडगाव जाणाऱ्या रोडवरील पारगाव पुलाखाली भीमा नदीपात्रात फेकून दिला होता. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटण्यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कुऱ्हाडवाडी येथे महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून रात्री बेकायदेशीर वाळू उपसा

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोडनदीतील वाळू उपसा करण्यासाठी शासनाने निमोणे आणि चिंचणी या दोन गावात वाळूडेपो उभारले. त्यासाठी शासनाने रीतसर वाळूचे टेंडर काढले. त्यानंतर वाळूउपसा चालुही झाला. परंतु सर्वसामान्य लोकांना 600 रुपये ब्रास प्रमाणे किती वाळू मिळाली हा संशोधनाचा विषय आहे. तसेच ठेकेदारांच्या व्यतिरिक्त कुऱ्हाडवाडी येथील स्थानिक वाळू माफिया महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून रात्रीच्या […]

अधिक वाचा..