body

जांबुत येथील तरुणाचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू; दुसऱ्यांदा घटना…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरूर) येथील सचिन बाळू जोरी (वय ३८) या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सदर मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्यात झाला असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून समोर आली आहे. यावेळी घटनास्थळी शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सुनिल उगले, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका घुगे आदी उपस्थित होते. सदर तरूण […]

अधिक वाचा..

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी 31 ऑगस्ट 2022 पूर्वी ई केवायसी करावी:-सिध्देश ढवळे

शिरुर: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना योजनेचा पुढील लाभ चालू राहण्यासाठी केंद्र सरकारने e kyc बंधनकारक केलेले असून लाभार्थीच्या ई केवायसी चे काम १०० टक्के पुर्ण करण्यासाठी शिरूर तालुक्यात ३१ ऑगस्ट पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कामी प्रत्येक गावात ज्या लाभार्थ्यांचे ekyc बाकी आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या विविध माध्यमातून प्रसिद्ध केल्या […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यात जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण; दोन जणांवर गुन्हे दाखल

शिरुर: नातीची शाळेत छेड काढल्याच्या गैरसमजातुन शिरुर तालुक्यात एका 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्याला वायरने पाठीवर, मानेवर, हातावर, तोंडावर अमानुषपणे मारहाण करत असताना त्या मुलाची आई मध्ये पडली असता तिलाही वायरने पाठीवर, पोटात तसेच पायावर मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन सदर महिलेच्या तक्रारीवरुन शिरुर पोलिसांनी याबाबत दोन जणांवर जातीवाचक शिवीगाळ […]

अधिक वाचा..
RANJANGAON

रांजणगाव येथील हॉटेल मोरया मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिरुर: रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील हॉटेल मोरया गार्डन मधील रुम नं 204 मध्ये शिरीष बबनराव डोंगरे (वय 48) रा. 2449 /08 आशय, डेपो रोड, यशवंत कॉलनी, वैजापूर ता. वैजापूर जि. औरंगाबादया व्यक्तीने नायलॉनच्या दोरीने सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली असुन याबाबत अरिहंत श्रीकांत ऐतवाडे (वय 20) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल […]

अधिक वाचा..

आंबळे विकासोच्या चेअरमनपदी शिवाजी दौंडकर यांची बिनविरोध निवड

शिरुर (तेजस फडके) शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक लाभ कसा देता येईल. यासाठी पुढील काळात मी प्रयत्न करीन असे प्रतिपादन नवनियुक्त चेअरमन शिवाजी दौंडकर यांनी केले. आंबळे-कळवंतवाडी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यामंध्ये सर्वानुमते चेअरमनपदी शिवाजी शंकर दौंडकर यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला तेव्हा […]

अधिक वाचा..
Mahaganpati

महागणपती मंदिरात मुक्तद्वार यात्रेचे आयोजन…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील श्री महागणपती मंदिरामध्ये रविवारपासून (ता. २८) साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाद्रपद गणेशोत्सवाची तयारी चालू आहे. महागणपती मंदिरात रविवार (ता. २८) ते बुधवार (ता. ३१) मुक्तद्वार यात्रेचे आयोजन केले आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती देवस्थानने दिली. श्री […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ऑनलाईन अश्लील चॅटिंगमुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड

शिरुर (तेजस फडके) सध्याच्या युगात माणुस दिवसभर उपाशी राहील. पण दिवसभर मोबाईलशिवाय राहू शकत नाही. तसेच मोबाईल हि हौस नसुन गरज झाली आहे. आज लहान मुलांपासुन वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच मोबाईलचं व्यसन लागलं आहे. त्यात तरुणपिढी तर या सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह असते. परंतु मोबाईलचे काही फिचर माहित नसल्याने किंवा चुकीचे अँप वापरुन ऑनलाईन व्हिडीओ सेक्स […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

पिंपळे जगतापला कंपनीतील दहा लाखांचा माल चोरणारे जेरबंद

शिक्रापुर (शेरखान शेख) पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील एका कंपनीतील फोर्जिंगचे महागडे दहा लाखांचे जॉब चोरुन विक्री करणाऱ्या सुरक्षा रक्षकासह भंगार खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत त्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून सागर राजेंद्र जाधव, योगेश प्रल्हाद काकपुरे, अशोक बाळू काळे व अब्दुलगफूर आदम शेख असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपळे जगताप येथे […]

अधिक वाचा..

यंदाचा गणेशोत्सव निर्भयपणे साजरा करा:- यशवंत गवारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव MIDC हद्दीतील गावांच्या गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष गावातील पदाधिकारी तसेच पोलीस पाटलांची आज (दि 23) रोजी शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांच्या अध्यक्षतेखाली रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. त्यावेळी पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे उपस्थित होते. यावेळी बोलताना यशवंत गवारी म्हणाले, गणेशोत्सव साजरा […]

अधिक वाचा..

करडे गावात शेवटच्या श्रावण सोमवारी अवतरले नागराज

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करडे गावात आज शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त भैरवनाथ मंदिरा समोर असणाऱ्या झुलत्या मनोऱ्याच्या बाजुलाच असणाऱ्या शंकराच्या पिंडीजवळ आज सायंकाळी सहाच्या सुमारास नागराजांनी दर्शन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी लांबूनच मोठ्या मनोभावे नागराजांचे दर्शन घेतले. करडे येथे भैरवनाथाचे मोठे मंदिर असुन या मंदिरासमोर प्राचीन झुलता मनोरा आहे. या मनोऱ्याच्या बाजुला महादेवाची पिंड आणि […]

अधिक वाचा..