आमची लग्न व्हायची आहेत; मुठभर चुकीच्या लोकांसाठी शिरुरची बदनामी कशासाठी…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांनी निवडणुकीत दारु आणि ड्रॅगचा मोठया प्रमाणात वापर केल्याचा विरोधकांवर गंभीर आरोप केला. या वक्तव्यांमुळे संपुर्ण तालुक्याच्या तरुणाईवर संशयाची सावली पडली असून, संतप्त युवकांनी सोशल मिडीयावर […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे किसान जागृती यात्रेची १६ फेब्रुवारीला जाहीर सभेची तयारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): देशातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांसाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत देशभर सुरु असलेली किसान जागृती यात्रा सोमवार दि १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे दाखल होणार असुन या यात्रेचे विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना व जनआंदोलनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. देशातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित व […]

अधिक वाचा..
Deepali-Gawhane

शिरूर! नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपाली गव्हाणे ॲक्शन मोडमध्ये…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस गणातील जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल लागून अवघे दोनच दिवस झाले असतानाच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपाली राहुल गव्हाणे यांनी कामाला सुरुवात केली आहे. दिपाली गव्हाणे यांनी आपल्या कार्यपद्धतीची वेगळी छाप उमटवण्याचा निर्धार केला आहे. पदाचा आनंद साजरा करण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देणारी त्यांची भूमिका सध्या सर्वत्र […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; दोन आरोपी ताब्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मौजे सरदवाडी हद्दीत आयएफबी कंपनीजवळ बुधवारी (दि. ११) उशिरा रात्री धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास नितीन […]

अधिक वाचा..

बेट भागात प्रथमच फुलले कमळ; दिलीप वळसे पाटील, देवदत्त निकम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादीच्या अंतर्गत नाराजीचा भाजपला लाभ शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात झालेली चौरंगी जिल्हा परिषद निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात प्रथमच ‘कमळ’ फुलले आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावडे यांनी विजय मिळवत पंचायत समितीच्या दोन्ही जागांवर कमळाचा झेंडा रोवला. या निकालामुळे गावडे घराण्याची प्रतिष्ठा राखली गेली असून […]

अधिक वाचा..
grampanchayat

शिरूर तालुक्यात निवडणूक जल्लोषानंतर शांतता अन् चर्चांना उधाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गावागावांत रात्रंदिवस प्रचार सुरू होता. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी जेवणाच्या पंगती, देवदर्शन यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बैठका घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. […]

अधिक वाचा..
nirmala-navale

‘पैसा-जिंकला, माणूस हरला’! ‘दारू-ड्रग्जचा वापर झाला’; पराभवानंतर निर्मला नवले यांचा गंभीर आरोप

पुणे: शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव गणातून राष्ट्रवादीच्या उमेदवार व माजी सरपंच निर्मला नवले यांचा अवघ्या ३०० मतांनी पराभव झाला. सोशल मीडियावर ‘रीलस्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवले यांच्या पराभवाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान, या निकालानंतर नवले यांनी स्वतः प्रतिक्रिया देत पराभवाची कारणे मांडली असून मनातील खदखदही व्यक्त केली आहे. Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा […]

अधिक वाचा..

रांजणगाव-कारेगाव गटात कमळाचा झंझावात; घड्याळाची टिकटिक बंद…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुकाच नव्हे तर संपुर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे ‘कमळ’ वादळासारखे फुलले, तर वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळाची टिकटिक मतदारांनी थेट बंद केली आहे’. हा निकाल म्हणजे केवळ पराभव नाही, तर राष्ट्रवादीच्या अहंकाराला बसलेली जबरदस्त चपराक असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या गटात राष्ट्रवादीची मक्तेदारी […]

अधिक वाचा..

शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात घड्याळाची टिकटिक सुरुच; कमळ मात्र कोमेजले,मालती पाचर्णे यांचा निसटता पराभव  

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही उमेदवार विजयी झाले. वृषाली वाळके यांनी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांचा अवघ्या 56 मतांनी पराभव केल्याने पाचर्णे कुटुंबाचे सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न भंगले. शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी समोरासमोर लढत होती. वृषाली बबन […]

अधिक वाचा..
shirur-taluka-zp-live-result

Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान झाले असून, आज (सोमवार) मतमोजणी होणार आहे. www.shirurtaluka.comच्या माध्यमातून Live निकाल दिला जात आहे. निकाल पुढीलप्रमाणे… मांडवगण-वडगाव रासाई सुजाता पवार – १६६९७ दादापाटील फराटे – ९७५६ सचिन शेलार – ४७५३ मच्छिंद्र गदादे – ९८९ वडगाव रासाई गण माऊली पाटोळे – ३२९५ […]

अधिक वाचा..