रांजणगाव गणपती येथे शेळके नगरमधील रस्त्याचे भुमिपुजन उत्साहात संपन्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच युवासेना पुणे जिल्हाप्रमुख बापुसाहेब कांतीलाल शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातुन रांजणगाव गणपती येथील शेळके नगर परिसरातील नवीन भांबर्डे रोड ते जुना भांबर्डे रोड या रस्त्यासाठी १०.५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. या विकासकामाचे भुमिपुजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या रस्त्याच्या कामामुळे शेळके नगर परीसरातील […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांची शेळी-बोकड चोरीप्रकरणी धडक कारवाई; दोन जणांना अटक करत १.१५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये शेळी आणि बोकड चोरीच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभुमीवर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत कौशल्यपुर्ण तपास करत अवघ्या ७२ तासांत दोन सराईत चोरट्यांना अटक करुन मोठी कामगिरी बजावली आहे. बाभुळसर खुर्द, करंजावणे, गणेगाव खालसा व वाघाळे परीसरात काहीजण दुचाकीवर […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मधील ITC च्या चमडिया गोडाऊनमधील लाखोंची चोरी उघड; ७२ तासांत आरोपीला अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती रोडवरील आयटीसी कंपनीच्या चमडिया गोडाऊनमधून सिगारेट, बिस्किटे व साबण असा कोट्यवधींचा मुद्देमाल चोरण्याची धाडसी घटना घडली होती. या प्रकरणात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत चोरीचा छडा लावत तब्बल ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.   View […]

अधिक वाचा..

शिरुरमधील रुबी हॉल संलग्न हॉस्पिटलवर गंभीर आरोप आयुष्यमान कार्ड असुनही गोरगरीबांची आर्थिक लुट…?

शिरुर (तेजस फडके): शासकीय आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असतानाही अपघातग्रस्त गोरगरीब रुग्णांकडुन बळजबरीने हजारो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार शिरुर येथे उघडकीस आला आहे. अपघातग्रस्तांना मोफत उपचार नाकारत हजारो रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात शिरुर येथील रुबी हॉल क्लिनिक (ग्रँट मेडिकल फाउंडेशन संलग्न) आणि […]

अधिक वाचा..
trupti-sarode

Video: शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात तृप्ती सरोदे यांना वाढता प्रतिसाद…

शिंदोडी (तेजस फडके) : शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार तृप्ती सरोदे यांना गटात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शिंदोडी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या वेळी महिला भगिनी, शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   View this post on Instagram   A […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या परिसरात दोनदा दुरुस्ती तरीही पुन्हा उखडलेला रस्ता; कोंढणओढ्यात नागरिकांचा संताप

शिरूर दि. २५(अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर–मलठण रस्त्यावरील कोंढणओढा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वेळा खड्डे भरून दुरुस्ती केल्यानंतरही काही दिवसांतच तोच रस्ता पुन्हा उखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेली ही दुरुस्ती दर्जाहीन असल्याचा आरोप होत असून, संबंधित विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या रस्त्यावरून […]

अधिक वाचा..

शाखा अभियंता झाला झाडांचा कसाई, घोडधरण वृक्षतोड प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी 

शिरूर (अरुणकुमार मोटे): घोड धरण परिसरातील बेकायदा वृक्षतोड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शाखा अभियंता वैभव काळे हा झाडांचा कसाई झाला असून ती झाडे कापून विकण्याचा प्रतापही त्याने केला आहे.या प्रकरणामुळे प्रशासनाची कार्यपद्धती, शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि पर्यावरण संरक्षणाबाबतची संवेदनशीलता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात थंडीचा कडाका; ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या

नागरिकांकडून थंडीपासून बचावासाठी विविध उपाययोजना शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर लक्षणीयरीत्या वाढला असून पहाटे व रात्रीच्या वेळी गारठा प्रचंड जाणवत आहे. किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने शेतकरी, मजूर, विद्यार्थी व नागरिकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी व पहाटे शेकोट्या पेटविल्या जात असून […]

अधिक वाचा..

घोड धरण परिसरात बेकायदा वृक्षतोडप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यावर गंभीर आरोप

प्रशासकीय यंत्रणेत खळबळ शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकारात पाटबंधारे विभागाचा शाखा अभियंता वैभव काळे हा अधिकारी थेट घटनास्थळी उपस्थित असून झाडे तोडण्याच्या कारवाईत सक्रीय सहभाग घेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. घटनास्थळी काळ्या रंगाची “महाराष्ट्र शासन” अशी […]

अधिक वाचा..

घोडधरण परिसरात पाटबंधारे विभागाकडून बेकायदेशीर वृक्षतोड; लाकूड विक्रीचा धक्कादायक प्रकार उघड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चिंचणी–घोडधरण परिसरात पाटबंधारे विभाग, शिरूर यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वृक्षतोड केल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंदाजे १५ ते २० वर्षे वयाची लिंब व इतर जातींची सुमारे २५ ते ३० मोठी झाडे पोकलेन मशिनच्या साह्याने तोडण्यात आल्याचा आरोप होत असून, या झाडांचे लाकूड गुणाट येथील एका खासगी लाकूड […]

अधिक वाचा..