shirur-blast

शिरूर! रांजणगाव गणपती परिसरात स्फोटाच्या धक्क्याने घरांना तडे; पाहा Video…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती तसेच पिंपरी दुमाला परिसरात सोमवारी (ता. २) अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटाच्या धक्क्याने काही घरांना तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) प्रत्यक्षदर्शींनी सांगितले […]

अधिक वाचा..

सरकारी दप्तर थेट गावात! शिरूरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’चा धडाका

शिरूर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन, दाखले व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न थेट गावपातळीवर सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” टप्पा क्र. १ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दि. ०१ मार्च रोजी विदयाधाम प्रशाला, शिरूर येथे पूर्वतयारी बैठक पार पडली. बैठकीचे […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये श्री शिवमहापुराण कथेला लाखोंची गर्दी; उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम ठरला ऐतिहासिक

शिरूर (अरुणकुमार मोटे): धार्मिक उत्साह, भक्तीभाव आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळालेला “श्री शिवमहापुराण कथा” सोहळा शिरूरमध्ये ऐतिहासिक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या कथेला कथेच्या ६ व्या दिवशी लाखोंच्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थिती लावल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेली गर्दी शिरूरच्या इतिहासात अभूतपूर्व मानली जात आहे. […]

अधिक वाचा..

गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडी शाळेच्या जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडीच्या जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अतिक्रमण करुन शाळेचे कामकाज विस्कळीत केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या मैदानाचे ट्रकरच्या साह्याने काकऱ्या मारुन नुकसान, बोअरवेलच्या मोटारीची वायर व पाईप तोडणे, तसेच विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याचे प्रवेशद्वार बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी म्हसोबावाडी जिल्हा […]

अधिक वाचा..

न्हावरेत किराणा दुकान फोडून धाडसी चोरी; चोरटा सिसीटिव्ही मध्ये कैद 

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात गुरवार (दि 26) मध्यरात्रीच्या सुमारास किराणा दुकान फोडून चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीन येळे यांच्या कोकरे किराणा स्टोअर या दुकानाचे छतावरील पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि रोकड लंपास करून पसार झाला. संपूर्ण प्रकार दुकानातील सिसीटिव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. याबाबत मिळालेल्या […]

अधिक वाचा..
Waghale yatra

वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिका माता यात्रा उत्सव दोन दिवस मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (ता. २४) ग्रामपंचायत प्रशासन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक, काठीची मिरवणूक काढून देवीला साडीचोळी अर्पण केली. सायंकाळी विठाबाई भाऊ (मांग) नारायणगांवकर यांचा लोकनाट्य तमाशाचा नागरिकांसह पै-पाहुण्यांनी आनंद लुटला. बुधवारी (ता. […]

अधिक वाचा..

शिरुर; शिक्षकाचे अपहरण, गावोगावी फिरवत, बेदम मारहाण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील संविदणे येथे राहणाऱ्या तरुण शिक्षकावर १२ जणांच्या टोळीने घरात घुसून हल्ला करत त्याचे अपहरण केल्याची संतापजनक घटना २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. आरोपींनी शिक्षकाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून गावाबाहेर नेले, तेथे मारहाण केली आणि पुन्हा गावाच्या चौकात आणुन हॉकीस्टिक व लाकडी दांड्यांनी बेदम चोप दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..

सरकारचा निवडणुकीपूर्वी ‘दिवसा वीज’ चा डंका अन निकालानंतर शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा काळोख

न्हावरे (तेजस फडके): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत सरकारच्या वतीने “शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज” देण्याची ग्वाही देत गावोगावी घोषणा झडल्या. राजकीय व्यासपीठांवरुन मोठमोठी आश्वासने देत मतांची मागणी करण्यात झाली. मात्र निकाल जाहीर होताच त्या आश्वासनांचा फुगा फुटला आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा काळोखच आला. सध्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेच्या भव्य सोहळ्याचे आयोजन

शिरुर (रुपाली खिलारी) शिरुर येथे रामलिंग रस्त्यावर आजपासुन दि. २४ ते २ मार्च या कालावधीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा वाचक प.पू. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमृतवाणीमधून श्री शिव महापुराण कथेचे दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत पी. आर. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. कथास्थळी […]

अधिक वाचा..
karegaon-traffic

शिरूर! कारेगाव येथील यश इन चौकात कंटेनर अडकल्याने तासभर वाहतूक ठप्प; पाहा Video

कारेगाव (तेजस फडके) : आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC च्या प्रवेशद्वारापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या पुणे-नगर महामार्गावर असलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यात आज (मंगळवार) सकाळी 7 सुमारास कंटेनरचे मागील चाक अडकल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. सकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे कंपनीत ये-जा करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना, ट्रान्सपोर्टरांना आणि प्रवाशांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागला. […]

अधिक वाचा..