केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाच्या चर्चेला वेग; महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नव्या टीमची घोषणा केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेला वेग आला आहे. पुढील काही महिन्यांत केंद्रातील मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता असून, तरुण आणि महिला नेत्यांना अधिक संधी देण्याबरोबरच काही राज्यांना अतिरिक्त प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पंतप्रधान […]

अधिक वाचा..

पंजाबमध्ये भाजपचा ‘एकला चलो’चा नारा; २०२७ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

अकाली दलासोबतची युती संपुष्टात; भाजपकडून सर्व ११७ जागांवर उमेदवार देण्याची घोषणा पंजाब: पंजाबच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भारतीय जनता पक्षाने २०२७ ची पंजाब विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अकाली दलासोबत पुन्हा युती होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष केवल सिंग ढिल्लन यांनी पक्ष सर्व ११७ विधानसभा मतदारसंघांत स्वतःचे उमेदवार […]

अधिक वाचा..

रूपाली चाकणकरांची हॉटेल व्यवसायात एन्ट्री; ‘द नाईन्स’च्या उद्घाटनाला राजकीय दिग्गजांची हजेरी

पुणे : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आता हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवले आहे. पुण्यात त्यांनी ‘द नाईन्स’ नावाने बार आणि रेस्टॉरंट सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी या हॉटेलचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्ती […]

अधिक वाचा..

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा रस्त्यावर उतरू; हर्षवर्धन सपकाळ

१३ दिवसांपासून उपोषण सुरू; महायुती सरकारवर आदिवासीविरोधी असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप मुंबई: राज्यातील पुणे, नाशिक, वर्धा, पालघरसह विविध ठिकाणी आदिवासी विद्यार्थी गेल्या १३ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. मात्र, राज्यातील भाजपा-महायुती सरकारला त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा काँग्रेसला […]

अधिक वाचा..

VJTI वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर ॲड. अमोल मातेले आक्रमक; प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टीमेटम

मुंबई : वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI), माटुंगा येथील वसतिगृहातील अस्वच्छता, दूषित पिण्याचे पाणी, बंद वॉटर कूलर व गीझर, उघड्या विद्युत वायरी आणि अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲड. अमोल मातेले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत ॲड. मातेले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने VJTI चे संचालक डॉ. सचिन कोरे यांची […]

अधिक वाचा..

न्या. सुनील शुक्रे महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त; राज्यपालांच्या हस्ते शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज महाराष्ट्राच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. लोकभवन, मुंबई येथे झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी न्या. शुक्रे यांना पदाची शपथ दिली. न्या. सुनील शुक्रे यांची नियुक्ती २०२३ च्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा किंवा वयाची ७० […]

अधिक वाचा..

रोहयोच्या कामांना गती द्या; पात्र नागरिकांना कामाची कमतरता भासू देऊ नका; भरत गोगावले

मुंबई: ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामांची संख्या वाढवावी आणि मंजूर कामांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत गोगावले यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. नंदुरबार जिल्ह्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच […]

अधिक वाचा..

संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही; एकनाथ शिंदेंचा ठाम निर्धार

अहिल्यानगर : महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची आणि भक्तांची भूमी आहे. संत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने राज्य सरकार काम करत असून, संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी, पंचक्रोशी येथे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त […]

अधिक वाचा..

भावनिक रक्षाबंधन; अजितदादांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून राखी अर्पण

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा भावनिक कार्यक्रम सोमवारी (२५ ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडला. महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैशाली नागवडे यांनी अजितदादांच्या प्रतिमेला राखी अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी […]

अधिक वाचा..

ओबीसींच्या स्वतंत्र कॉलमसाठी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी; संभाजीनगरात भव्य महामोर्चा

दिल्लीतील जंतर-मंतरवरही आंदोलन मुंबई: केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र नोंद असताना ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात आलेला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत ओबीसी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसींची अचूक लोकसंख्या समोर यावी आणि त्यानुसार सामाजिक न्यायाची धोरणे आखली जावीत, यासाठी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असावा, अशी मागणी करण्यात आली […]

अधिक वाचा..