स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांत मराठी भाषा विभाग अनिवार्य; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच सर्व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभागाची स्थापना करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांच्या प्रायोजक मंडळाचे अध्यक्ष आणि […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राला देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचा संकल्प; विकासासोबत पर्यावरण आणि सर्वसामान्यांना प्राधान्य

मुंबई: जगभरात वेगाने विकास होत असताना महाराष्ट्रानेही देशाच्या गतिशील विकासाचे ‘चेंज मेकर्स’ बनावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबईपुरता विकास मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राला देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘इकॉनॉमिक टाइम्स बिझनेस कॉनक्लेव्ह अँड अवॉर्ड्स २०२६’मध्ये बोलताना शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप मांडला. राज्याची प्रगती […]

अधिक वाचा..

उल्हासनगर-कल्याणमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिक संतप्त

उल्हासनगर : उल्हासनगर आणि कल्याण शहरासह ग्रामीण परिसरात दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार वीज जाण्यामुळे घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून, नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वीज वितरण विभागाकडून सातत्याने देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा बंद केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, वर्षभरात देखभालीच्या कामांवर […]

अधिक वाचा..

‘मोदींनी चहा कुठे विकला?’; संजय राऊतांचा फडणवीसांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहावाला’ या राजकीय प्रतिमेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी ज्या काळात गुजरातमधील रेल्वे स्थानकावर चहा विकत असल्याचा दावा केला जातो, त्या काळात संबंधित रेल्वे स्थानकच अस्तित्वात नव्हते, असा दावा राऊत यांनी केला. “मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा […]

अधिक वाचा..

२२ वर्षांच्या आकडेवारीचा सरकारसमोर आरसा; देश पुढे गेला, पण सामान्य माणसाचे आयुष्य किती बदलले?

मुंबई : देशाचा विकास नेमका कोणत्या निकषांवर मोजायचा, यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू झाली आहे. २००४ ते २०२६ या २२ वर्षांच्या कालखंडातील विविध आर्थिक, सामाजिक आणि विकासात्मक निकषांची तुलना करणारी आकडेवारी सूरज सामंत यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी फेसबुक पोस्टद्वारे मांडली आहे. या आकडेवारीच्या आधारे केंद्र सरकारच्या विकासाच्या दाव्यांचे मूल्यमापन करण्याची मागणी […]

अधिक वाचा..

आंबेडकर उद्यानाच्या वाढीव जागेऐवजी उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी; नोवेल साळवेंचे आवाहन

कल्याण : कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी वाढीव जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांचे अभिनंदन करतानाच, उद्यानालगतच्या जागेवर उपजिल्हा मध्यवर्ती रुग्णालय उभारण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे यांनी केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी शासकीय उपजिल्हा मध्यवर्ती […]

अधिक वाचा..

बळीराजा, महिला आणि तरुणांसाठी महायुती सरकार कटिबद्ध; कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार; एकनाथ शिंदे

मुंबई: शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत आहे. “महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा” या भूमिकेतून शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याचे शिंदे […]

अधिक वाचा..

घाटकोपरच्या रामजीनगरातील तुंबलेल्या शौचालयांवरून महापालिकेला धारेवर; महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील रामजीनगर परिसरातील तुंबलेली सार्वजनिक शौचालये, अस्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधीमुळे स्थानिक महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. या प्रश्नावर त्यांनी मुंबई महापालिकेच्या परिमंडळ-६ चे उपायुक्त आणि ‘एन’ विभागाच्या सहायक आयुक्तांना ई-मेलद्वारे पत्र पाठवत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रामजीनगर […]

अधिक वाचा..

नाशिकमध्ये काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण; समारोपाला राहुल गांधींची उपस्थिती

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानांतर्गत’ निवड झालेल्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आज नाशिक येथे उद्घाटन झाले. दीपप्रज्वलन आणि ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने शिबिराची सुरुवात करण्यात आली. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव, महाराष्ट्राच्या सहप्रभारी रेहाना चिश्ती, खासदार […]

अधिक वाचा..

मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला; ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन

मुंबई: मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात प्रदीर्घ आणि समर्पित कार्य करणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वाची मोठी हानी झाली आहे. “मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी डॉ. शेख यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. यास्मिन शेख यांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठी भाषा, भाषाशास्त्र आणि […]

अधिक वाचा..