विरार इमारतीच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू 

वसई: विरार इमारत दुर्घटनेत मागील वीस तासांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 17 जणांचा शोध लागला असून त्यात 14 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी झाले आहे. तर 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. मंगळवारी रात्री विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या […]

अधिक वाचा..

गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात तोडपाण्याचा उद्योग, महाराष्ट्र बिहार होण्याच्या मार्गावर

पुणे: पुण्यात गोरक्षकांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी निषेध व्यक्त केला. गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये तोडपाण्याचा उद्योग सुरू असून महाराष्ट्र बिहारप्रमाणे होण्याच्या मार्गावर असल्याची टीका नायकवडी यांनी केली. त्यामुळे या गोरक्षकांच्या मुद्यावरुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या इद्रिस नायकवडी यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला. गोरक्षणाच्या […]

अधिक वाचा..

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत बाळा नांदगावकर यांची भावनिक पोस्ट

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. या भेटीच्या वेळी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे प्रमुख नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांमध्ये तीनवेळा एकत्र आल्याचं […]

अधिक वाचा..

मी संस्थानिकांचा, राजा महाराजांचा मुलगा नाही; जयकुमार गोरे

सातारा: प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो. मी माझा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय तसाच ते देखील करत आहेत. मात्र, कोणी असुरक्षित वाटून घेण्याचे कारण नाही. कोण किती मतांनी निवडून आले आहे ते निवडणूक आयोग व तुम्हालाही माहीत आहे. मी संस्थानिकांचा मुलगा नाही, मी राजा महाराजांच्या कुटुंबातून आलेलो नाही, सामान्य शेतकर्‍याचा पोरगा म्हणून मी […]

अधिक वाचा..

मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आज बंद

चाकण: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे जाणा-या मोर्च्यामुळे गुरुवारी (दि.२८) तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे मोर्चासह गुरुवारी (दि. २८) पहाटे किल्ले शिवनेरीचे दर्शन करुन […]

अधिक वाचा..

सिल्व्हर रॉक्स, पुणे येथे डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना

शेतकरी, महिला सुरक्षितता आणि राज्य-देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना पुणे: गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सिल्व्हर रॉक्स, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथील निवासस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि त्यांची भगिनी श्रीमती जेहलम जोशी यांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. जवळपास ५० वर्षांची ही परंपरा त्यांच्या आई-वडिलांनी – डॉ. दिवाकर गोऱ्हे व सौ. लतिका गोऱ्हे – यांनी सुरू केली […]

अधिक वाचा..

शिर्डीतील चार हॉटेल एक वर्षासाठी सील

अहिल्यानगर: हॉटेल्सवर देहविक्रीचा अवैध व्यवसाय चालविला जात असल्याचे समोर आले आहे. शिर्डीत देखील काही दिवसांपूर्वी हा प्रकार समोर आला होता. त्यानुसार शिर्डी शहरात वेश्या व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शहरातील चार हॉटेल्स एक वर्षासाठी सील करण्यात आले आहे. शिर्डीमध्ये काही दिवसांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी […]

अधिक वाचा..

राजस्थान उच्च न्यायालयाकडून आसाराम बापूंना मोठा झटका

राजस्थान: लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली जोधपूरमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन वाढवण्यास नकार दिला. अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे हा निर्णय देण्यात आला. आता आसारामला ३० ऑगस्टपर्यंत जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण करावे लागणार आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की वैद्यकीय अहवालानुसार, […]

अधिक वाचा..

जरांगेंच्या टीकेनंतर चित्रा वाघ कडाडल्या! ‘काय उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही’…

मुंबई: मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांनी भाजपाच्या आमदार व महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यावर दोन दिवसांपुर्वी टीका केली होती. माझ्या नादाला लागू नको, नाहीत तुझं सगळं गबाळं उचकीन, आमच्या आया-बहीणींवर हल्ला झाला तेव्हा तू कुठे गेली होती’ […]

अधिक वाचा..

मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी

मुंबई: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला अखेर परवानगी मिळाली आहे. मात्र ही परवानगी काही अटी व शर्तींसह देण्यात आली आहे.जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील उपोषणकर्त्यांनी आंदोलनासाठी केलेल्या मागणीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आझाद मैदान पोलीस ठाणे यांनी ही परवानगी दिली. प्रमुख अटी व शर्ती स्थळ व वेळ: […]

अधिक वाचा..