रामदास आठवले सामाजिक न्यायाची मशाल; एकनाथ शिंदेंकडून तोंडभरून कौतुक

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्याचा गौरव केला. आठवले यांना “सामाजिक न्यायाची मशाल, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बाबासाहेबांच्या विचारांचे सच्चे अनुयायी आणि नीडर मास लीडर” अशा शब्दांत शिंदे यांनी गौरविले. राज्यातील १३ कोटी जनता तसेच शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांनी आठवले यांना […]

अधिक वाचा..

आदिवासी आश्रमशाळांमध्ये दोन वर्षांत ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू; गंभीर आजारांमुळे २७३ बळी

मुंबई : महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये तब्बल ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी २७३ विद्यार्थ्यांचा मृत्यू गंभीर आजारांमुळे झाला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत सरकारी आश्रमशाळांमधील ३६४, तर अनुदानित आश्रमशाळांमधील २०० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला […]

अधिक वाचा..

पुणेकरांच्या आवडत्या बर्गर किंगसह सयाजी हॉटेल आणि झेप्टोवर FDA ची कारवाई; अन्न परवाने निलंबित

पुणे : पुणेकरांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांच्या ठिकाणांसह ऑनलाईन किराणा वितरण केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. पुणे कॅम्पमधील प्रसिद्ध बर्गर किंग, लोणावळ्यातील हॉटेल सयाजी आणि लोहेगाव येथील झेप्टो केंद्राचे अन्न परवाने अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खाद्य क्षेत्रात […]

अधिक वाचा..

20 वर्षांत 40 बदल्या! तुकाराम मुंढेंनाही मागे टाकणाऱ्या IPS अधिकारी डी. रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कारकीर्द

मुंबई: प्रशासकीय सेवेत प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दबाव आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रातील IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत 25 बदल्या झाल्याची चर्चा नेहमीच होते. मात्र, बदलीच्या बाबतीत कर्नाटक कॅडरच्या IPS अधिकारी डी. रूपा मौदगिल यांची कारकीर्द त्याहूनही अधिक चर्चेत आहे. त्यांच्या सुमारे 20 वर्षांच्या सेवेत तब्बल […]

अधिक वाचा..

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील;  सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक; उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला दिल्या तातडीने सूचना पुणे: चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधा संबंधी अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली व चाकण येथील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनासोबत लवकरच बैठक […]

अधिक वाचा..

सुखबीर बादलांवर हल्ला करणारा जसपालसिंग कोण? पुण्यात वकिली, दोन वर्षांपासून गुरुद्वारात सेवा

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदेडजवळील मुगट येथील मातासाहिब गुरुद्वारात दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडत असताना हा प्रकार घडला. हल्ल्यानंतर आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. हल्लेखोराची ओळख जसपालसिंग अशी झाली असून तो पेशाने वकील असल्याची माहिती समोर आली आहे. ६२ […]

अधिक वाचा..

एका वर्षात हजारो सरकारी शाळा घटल्या; महाराष्ट्रातही ३५७ शाळांना फटका

नवी दिल्ली : देशातील सरकारी प्राथमिक शाळांच्या संख्येत एका वर्षात तब्बल ९,८६६ ने घट झाल्याची धक्कादायक आकडेवारी लोकसभेत सादर करण्यात आली आहे. ‘युडायस प्लस’ (UDISE+) च्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ मध्ये देशात सरकारी प्राथमिक स्तरावरील ८,८९,८०६ शाळा होत्या. २०२५-२६ मध्ये ही संख्या घटून ८,७९,९४० वर आली आहे. म्हणजेच एका वर्षात सुमारे १.१ टक्क्यांनी सरकारी प्राथमिक शाळांची संख्या […]

अधिक वाचा..

महागाईचा भडका; घरखर्चाचे गणित कोलमडले! उत्पन्न जैसे थे, मात्र खर्चाचा आलेख वाढता

नाशिक : महागाईचा वाढता आलेख सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थकारणावर परिणाम करू लागला आहे. किराणा मालासह भाजीपाला, खाद्यतेल, गॅस आणि इंधनाच्या खर्चात वाढ झाल्याने महिन्याचे बजेट सांभाळताना नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक कुटुंबांचे घरखर्चाचे गणित कोलमडले असून, कमी उत्पन्न आणि वाढता खर्च अशी दुहेरी कोंडी निर्माण झाली आहे. परिसरातील बाजारपेठांमध्ये साखर, कांदा आणि […]

अधिक वाचा..

NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद; १ कोटींहून अधिक नोंदणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल आणि कॅशलेस प्रवासाच्या दिशेने एसटीने सुरू केलेल्या या उपक्रमाला अल्पावधीतच लाखो प्रवाशांनी प्रतिसाद दिला आहे. १२ ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी […]

अधिक वाचा..

भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने, महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने; देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने, तर महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विविध देशांचे महावाणिज्यदूत, राजनैतिक अधिकारी, वाणिज्यदूत, विविध देशांचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित […]

अधिक वाचा..