हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; ५७ कक्षांच्या सुसज्ज वास्तूचे लोकार्पण

मुंबई : मलबार हिल येथील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. राज्यात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, परदेशी शिष्टमंडळे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या निवासासाठी हे अतिथीगृह सुसज्ज करण्यात आले आहे. या नव्या अतिथीगृहात एकूण ५७ कक्ष असून, त्यामध्ये ६ व्हीव्हीआयपी आणि ५१ इतर कक्षांचा समावेश आहे. तळमजला अधिक […]

अधिक वाचा..

RSS-BJPची तिरंगा रॅली म्हणजे केवळ फोटोसेशन; इतिहास खोटे बोलत नाही; महेश तपासेंचा घणाघात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रवक्ते महेश तपासे यांनी RSS-BJPच्या तिरंगा रॅलीवर जोरदार टीका केली आहे. तिरंगा रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादाचे प्रदर्शन केले जात असून, RSSच्या इतिहासातील काही घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप तपासे यांनी केला. तपासे म्हणाले की, “भाजप आणि त्यांची मातृसंस्था RSS तिरंगा यात्रेच्या नावाखाली फोटोसेशन करतात आणि देशाला देशभक्तीचे […]

अधिक वाचा..

शिवसेना पक्षफुटी प्रकरणात सिब्बलांचा दोन सवालांनी शिंदे गटाची कोंडी?

नवी दिल्ली : शिवसेना पक्षफुटी आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज, १३ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या प्रक्रियेवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोगाने संबंधित प्रकरणात तथ्यांची योग्य पडताळणी करून निर्णय दिला का, असा सवाल सिब्बल यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला. ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जुलैचा हप्ता लवकरच खात्यात; सरकारकडून 344 कोटींचा निधी मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, जुलै महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेल्या महिलांसाठी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जुलैच्या […]

अधिक वाचा..

‘भोळा राहिलो तर भाजपवाले खाऊन जातील’; गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ!

जळगाव : महायुतीतील तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला, तरी अधूनमधून नेत्यांच्या वक्तव्यांतून अंतर्गत मतभेद आणि अविश्वास समोर येत असतो. आता मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “मी भोळा राहिलो तर मला भाजपवाले खाऊन जातील,” असे विधान गुलाबराव पाटील […]

अधिक वाचा..

नाशिकमध्ये काँग्रेसचे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण; राहुल गांधी करणार विशेष मार्गदर्शन

मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान होणारे हे शिबिर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षण […]

अधिक वाचा..

मुंबई–गोवा महामार्गासाठी ‘एक गोणी खडी’चा अनोखा संकल्प; चाकरमान्यांना ज्येष्ठ पत्रकार राजन पारकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई–गोवा महामार्गाचा रखडलेला प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना खड्डे, धूळ आणि वाहतूककोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार राजन पारकर यांनी यंदा ‘एक गोणी खडी’चा अनोखा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास […]

अधिक वाचा..

झोपडपट्टीमुक्त मुंबई हवी, पण माणूसमुक्त नव्हे; SRA-MHADAच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांचा मार्ग

मुंबई : मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. रोजगार, व्यवसाय आणि चांगल्या आयुष्याच्या अपेक्षेने देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो नागरिक मुंबईत येतात. मात्र वाढती लोकसंख्या, महागडी जमीन, वाढते घरभाडे आणि मर्यादित उत्पन्न यामुळे शहरातील गृहनिर्माणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परिणामी अनेक कुटुंबांना झोपडपट्ट्यांमध्ये राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करताना केवळ अनधिकृत […]

अधिक वाचा..

चाकणच्या रस्त्यांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत मैदानात; १६ ऑगस्टला उद्योजकांसोबत बैठक

चाकण: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, यामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यांत स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणमधील औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. उद्योजकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता चाकण येथे उद्योजक […]

अधिक वाचा..

‘आदिवासींच्या हक्काचा पैसा जातो कुठे?’; आश्रमशाळांच्या कारभारावर वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

नागपूर: आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसतील, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि त्यासाठी मंजूर झालेला निधी पूर्णपणे खर्च होत नसेल, तर याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काचा पैसा नेमका कुठे जातो, असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यामागे सरकारकडून सुमारे दोन हजार रुपये खर्च […]

अधिक वाचा..