आता महाविकास आघाडीचेच दिवस येणार; धनंजय मुंडे

परळी: महाविकास आघाडी राज्यात एकदम भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्वत्र विजयी जल्लोष साजरी करताना दिसेल, त्याचा उगम आज परळीत होतोय, परळी वैद्यनाथ हा आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू ठरेल, असे मत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी परळी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. धनंजय मुंडे यांनी खा.संजय राऊत यांचे स्वागत करताना स्वतःच्या […]

अधिक वाचा..

सरसकट सर्वांची फेरपरीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. टंकलेखनच्या या ऑनलाईन परिक्षेत काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र ही टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षाच रद्द करुन पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक […]

अधिक वाचा..

पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटवरुन गुन्हा दाखल 

पुणे: येथील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली असुन राज रावसाहेब गर्जे (रा. पाटसरा, ता.आष्टी, जि. बीड) असे त्याचे नाव असुन या संदर्भात महाविधी लाँ स्टुडंटन्स असोसिएशन या विधी शाखेतील विद्यार्थ्यांकरिता काम करण्याऱ्या सामाजिक संस्थेकडून चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची भेट घेऊन […]

अधिक वाचा..

आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता करा…

भाजप आमदाराचा भाजपला घरचा आहेर; विकास निधी मिळत नसल्याची तक्रार… मुंबई: विकास निधी मिळत नसल्याची तक्रार वर्ध्याचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करुन नाराजी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता भाजपने करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य […]

अधिक वाचा..

त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपाचा कुटिल डाव गावकऱ्यांनी उधळून लावला…

मुंबई: महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटना करत असल्याचे मागील काही दिवसापासून दिसत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याच्या प्रकरणाला भाजपाशी संबंधित लोकांनी जाणीवपूर्वक वादाचा रंग देऊन वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून गावातील वातावरण शांत आहे […]

अधिक वाचा..

नाल्यांचे अधिकाधिक खोलीकरण करून पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्या….

मुंबई: मुंबईतील सुमारे २२०० कीमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष जागेवर जात आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला. दुपारी […]

अधिक वाचा..

भाभा रुग्णालयातील असुविधांविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन…

मुंबई: कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील असुविधांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ. सईदा खान यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात यावा, रुग्णालयात केईएम, नायर, या रुग्णालयाप्रमाणे एमआरआयची सुविधा त्वरीत उपलब्ध करावी, रक्त चाचणी सुविधा २४×७ सुरू ठेवण्यात यावी, दुसरे शस्त्रक्रिया दालन तात्काळ सुरू करावे, शस्त्रक्रिया […]

अधिक वाचा..

आत्मवंचना करणारे फडणवीस सर्वसामान्यांना फसवू शकत नाहीत…

मुंबई: माजी मुख्यमंत्री व नाईलाजास्तव झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे “मी पुन्हा येईन फेम” आहेत, त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला. नंतरची वक्तव्ये पाहिली तर दिव्यांगालाही किव येईल, अशी आहेत. एकनाथ शिंदेंचे आपण समजू शकतो त्यांनी मिंधेपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. त्यांची अवस्था रक्ताला चटावलेल्या वाघाच्या पाठीवर बसल्यासारखी झाली आहे. वाघ मेल्यानंतरच पाठीवरून उतरलं तरच जगणार, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात दंगलसदृश्य वातावरण निर्माण होतेय ही चिंतेची बाब…

मुंबई: महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची […]

अधिक वाचा..

पत्रकारांना मारहाण करणाऱ्या राजकीय गुंडांवर पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार कारवाई व्हावी…

मुंबई: चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात दिनांक १३मे रोजी मुंबई महानगर पालिकेच्या महिला स्वयंरोजगार योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात आसपासच्या परिसरातील महिला उपस्थित राहणार होत्या. मा मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे आणि मा उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस येणार असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळणार हे गृहित होत. मात्र सरकारने मध्यंतरी जी आर केला की, दुपारी १ ते ४या वेळेत उन्हाचा तडाखा […]

अधिक वाचा..