आत्मवंचना करणारे फडणवीस सर्वसामान्यांना फसवू शकत नाहीत…

महाराष्ट्र

मुंबई: माजी मुख्यमंत्री व नाईलाजास्तव झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे “मी पुन्हा येईन फेम” आहेत, त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला. नंतरची वक्तव्ये पाहिली तर दिव्यांगालाही किव येईल, अशी आहेत. एकनाथ शिंदेंचे आपण समजू शकतो त्यांनी मिंधेपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. त्यांची अवस्था रक्ताला चटावलेल्या वाघाच्या पाठीवर बसल्यासारखी झाली आहे. वाघ मेल्यानंतरच पाठीवरून उतरलं तरच जगणार, पाठीवरून उतरलो तर तो कच्चा खाऊन टाकणार ! अशी अवस्था झाली आहे. एकनाथ शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री असून देवेंद्र फसवणीस व त्याचे दिल्लीतील आलाकमान हेच कळसुत्री बाहुल्याप्रमाणे शिंदेंना खेळवत आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदाचे दाणे टाकून स्वकियांशी झुंजवत ठेवले आहे.

मंत्री मंडळ विस्ताराचे गाजर दाखवत त्यांच्या आसपास वावरणा-या कोंबड्यांना खेळवत व खिळवुन ठेवले आहे. बच्चुभाऊ कडू सारखा लढवैया नेता आज “काहीही करा, कोणतेही खाते द्या पण मला मंत्री करा !” असे म्हणत लाळघोटेपणा करीत प्रतिक्षा करीत बसले आहेत. इतर ईडीग्रस्त आमदार केविलवाणेपणे मंत्री मंडळ विस्ताराकडे आस लावुन बसले आहेत परंतू ते जास्त वळवळ करू शकत नाहीत. कारण प्रतापी सरनाईक सारखी ईडीची फाईल कधीही ओपन होऊ शकते.

सद्याचे मंत्री मंडळ हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वोच्च कलंकित व बदनाम मंत्रीमंडळ आहे. देवेंद्र फसवणीस उसने अवसान आणत आमचे सरकार संवैधानिक आहे म्हणून वाचले, आमचा विजय झाला, ठाकरे यांच्या शिवसेनेची एकही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली नाही, त्यांचा पोपट मेला आहे, असे वाट्टेल ते बडबडत सुटले आहेत.

वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला असंवैधानिक असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.राज्यपालांचे सर्व निर्णय बेकायदेशीर व असंवैधानिक ठरवले आहेत. बहुमत चाचणी असो कि राज्यपालांनी बोलवलेले अधिवेशन असो, किंबहुना देवेंद्र फसवणीस यांनी राज्यपालांना दिलेले पत्र ! सारेच बेकायदेशीर ठरल्याचा निर्विवाद निर्णय दिला आहे.

एक अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचे मान्य करून त्यांच्याकडे सोपवले आहे. त्याच वेळी व्हिप कोण ? कोणाचा व्हिप कायदेशीर ? याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्यात भरत गोगावले यांची निवड बेकायदेशीर आहे,इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गटनेते पदाची निवडही बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहिर केले आहे. याउपरही देवेंद्र फसवणीस व एकनाथ शिंदे हे आमचे सरकार संवैधानिक आहे, विजय आमचा झाला ! अशा डराव डरावला आपली डरकाळी मानत असतील तर ती स्वत:चीच आत्मवंचना ठरते. सर्वसामान्य जनता व युवापिढी आत्ता निर्बुद्ध राहिलेली नाही.खोटं बोला पण रेटून बोला ! हा फाॅर्म्युला आत्ता कामी येणार नाही.त्यामुळे फसवणीसांनी ही फसवेगिरी बंद करावी.

पुर्वी राजकारण्यांचे वर्णन करताना गेंड्याची कातडी अशी उपमा दिली जात होती.ती उपमा आत्ता खुजी झाली आहे. कासवाची पाठ नरम वाटावी, इतका निलाजरेपणा सद्याच्या सत्ताधा-यांत आला आहे. सर्वोच्च न्यायलयाने संपूर्ण वस्त्रहरण करून फक्त लंगोट शिल्लक ठेवली असताना, भरजरी व शाही वस्त्र परिधान केली आहेत, या अविर्भावात E D सरकार वावरत असेल तर कामाख्या देवी तरी त्यांना कशी वाचवेल ? ०.१ % जरी नितीमत्ता शिल्लक असेल तर न्यायालयाच्या निकालाचा सन्मान राखत या ED सरकारने पायउतार व्हावे.

जाता जाता -शिंदेंच्या फुटीर गटाला, आम्हीच खरी शिवसेना म्हणण्याचा अधिकार नाही, विधी मंडळ पक्षापेक्षा मुळ राजकिय पक्षच श्रेष्ठ असतो, त्यामुळे मिंधे गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण या चिन्हाला देखील नजीकच्या काळात मुकावे लागेल, याचे त्यांनी भान ठेवावे.