अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक गोंधळावरून शिक्षण विभागावर टीका; ॲड. अमोल मातेले 

मुंबई: अकरावीच्या केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना ईमेलद्वारे सविस्तर पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ समीक्षक नीलिमा जांगडा यांना ‘ललिता ताम्हाणे स्मृती पुरस्कार’ जाहीर

मुंबई: ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार पाटील यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या ‘कलाश्रम’ संस्थेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘ललिता ताम्हाणे स्मृती पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व लेखिका नीलिमा जांगडा यांना जाहीर करण्यात आला आहे. कलाश्रम संस्थेतर्फे दर महिन्याला ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम राबविण्यात येतो. संबंधित महिन्यातील दिवंगत प्रज्ञावंतांचे स्मरण आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या गुणीजनांचा सन्मान, असा […]

अधिक वाचा..

नीट पेपरफुटीवरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; विजय वडेट्टीवार

नागपूर: देशात गेल्या दहा वर्षांत अनेक पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटत असतील आणि सिस्टममधील लोकच त्यात सामील असतील, तर याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी नागपूर येथे केली. केंद्रीय शिक्षणमंत्री Dharmendra Pradhan यांनी नैतिकतेच्या आधारावर आतापर्यंत राजीनामा द्यायला हवा होता, असे सांगत वडेट्टीवार […]

अधिक वाचा..

वांद्रा अतिक्रमण प्रकरणात १५ जण अटकेत; भूमाफिया आणि भ्रष्ट साखळीवर कारवाईची मागणी जोरात

मुंबई : वांद्रा रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून सुमारे १५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर केवळ दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत […]

अधिक वाचा..

ठाण्यात अत्याधुनिक ‘लेग्रँड इन्स्टिट्यूट’चे उद्घाटन; युवकांच्या स्वप्नांना नवे पंख; एकनाथ शिंदे

मुंबई: Eknath Shinde यांनी ठाण्यातील अत्याधुनिक ‘लेग्रँड इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड एज्युकेशन’ प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करताना, “हे केवळ इमारतीचे उद्घाटन नसून युवकांच्या आकांक्षा आणि स्वप्नांना नवी दिशा देणाऱ्या प्रवासाची सुरुवात आहे,” असे प्रतिपादन केले. ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha, फ्रान्सच्या मुंबईतील उप-वाणिज्यदूत ॲग्नेस सिल्वा, Legrand India चे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीतील सर्व गैरसमज दूर; राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा; सुनिल तटकरे

नवी दिल्ली: Sunil Tatkare यांनी आज दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाल्याचा दावा करत, पक्षसंघटनेची मजबूत बांधणी आणि विस्तारासाठी लवकरच राज्यव्यापी दौरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसंदर्भात निवडणूक आयोगाला आवश्यक ते सुधारित पत्र येत्या काही दिवसांत सादर करण्यात येईल. यासाठी पक्षांतर्गत बैठकीत सर्व नेत्यांमध्ये सविस्तर आणि सकारात्मक […]

अधिक वाचा..

शिक्षण विभागाच्या प्रलंबित प्रश्नांवर पुण्यात मॅरेथॉन बैठक

२५ मेपर्यंत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा पुणे: सत्यजीत तांबे यांच्या पुढाकारातून पुणे येथे शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर गुरुवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी जवळपास ६ वाजेपर्यंत चालली. राज्याचे शिक्षण आयुक्त सुचेंद्र प्रतापसिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण संस्थांशी संबंधित विविध प्रशासकीय […]

अधिक वाचा..

वाईच्या लघुकुंभमेळ्याने ‘दक्षिण काशी’ ची ओळख अधिक उजळली; मंत्री जयकुमार गोरे

मुंबई: सातारा जिल्ह्यातील वाई नगरीला “दक्षिण काशी” म्हणून ओळखले जाते. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या या ऐतिहासिक शहरात आयोजित करण्यात आलेल्या लघुकुंभमेळ्यामुळे वाई नगरी अधिक पावन झाल्याची भावना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. वाईच्या कुंभमेळ्याची महती संपूर्ण राज्यभर पसरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वाई येथे आयोजित लघुकुंभमेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गुजरातहून आलेले परमपूज्य […]

अधिक वाचा..

मृत जवानांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत; १० दिवसांत मार्केट पूर्ववत करण्याचे शिंदेंचे निर्देश

ठाणे: ठाण्यातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या जवान आणि सुरक्षारक्षकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमी झालेल्या दोन अग्निशमन जवानांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केली. गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना […]

अधिक वाचा..