शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई! पाच सराईत आरोपींना दोन वर्षांसाठी तडीपार

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाच सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पूनम अहिरे, उपविभागीय दंडाधिकारी शिरूर तथा परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी यांनी दिनांक १४ ऑक्टोबर रोजी जारी केले आहेत.या आरोपींना संपूर्ण पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द तसेच सोलापूर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून तडीपार करण्यात आले […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यात जमीनीच्या ताब्याच्या वादातुन सिनेस्टाईल हाणामारी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावात जमीनीचा ताबा घेण्याच्या वादातुन एखाद्या दक्षिणात्य चित्रपटाचे कथानक शोभेल अशी सिनेस्टाईल हाणामारी झाली. न्यायालयात खटला प्रलंबित असलेल्या शेतीचा ताबा घेण्यासाठी जबरदस्तीने शेतात घुसून ट्रॅक्टरने पिके उध्वस्त केली गेली. तसेच विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला आणि महिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात काशीनाथ भाकरे […]

अधिक वाचा..

पुणे अहिल्यानगर महामार्गावर चाकूचा धाक दाखवून चोरी करणारे तीन आरोपी जेरबंद

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे): रात्रीच्या वेळी चाकूचा धाक दाखवून हायवेवर प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजाआड केले आहे. या आरोपींकडून तब्बल २४ मोबाईल फोन, रोख रक्कम, चाकू आणि मोटारसायकलसह एकूण ३ लाख ३ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी […]

अधिक वाचा..

चिमुकल्यांचा जीव गेला पण मुख्यमंत्री मात्र कबुतरांसाठी वेळ काढतात; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची खंत

बिबट्याच्या हल्ल्यांवर ठोस कृती आराखड्याची मागणी जनआंदोलनाचा इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका व जुन्नर परिसरात गेल्या दहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे दोन निरागस चिमुकल्यांचा जीव जाण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाच वर्षांची शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तर काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथेही अशाच घटनेत आणखी एका चिमुकल्याचा […]

अधिक वाचा..

शिरूरचा सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही साखरझोपेत; पाऊस थांबला तरी रस्त्यांवरील खड्डे कायम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम शिरूर यांच्या हद्दीतील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळा संपत आला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र अजूनही साखरझोपेत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील प्रमुख रस्ते, अंतर्गत गाव रस्ते, तसेच शिरूर शहरातून ग्रामीण भागाकडे जाणारे मुख्य मार्ग हे अक्षरशः खड्ड्यांमध्ये विलीन झाले आहेत. वाहनधारकांना रोज जीव मुठीत […]

अधिक वाचा..

शिरुरच्या ७ जिल्हा परिषद गट तसेच १४ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी आज दि १३ ऑक्टोबर २०२५ आरक्षण सोडत उत्साहात पार पडली. शिरुर तहसिल कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी विठ्ठल जोशी व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत चिठ्ठी पद्धतीने ही सोडत घेण्यात आली. विशेष म्हणजे या वेळी नागरिक व इच्छुक प्रतिनिधींची उपस्थिती अत्यल्प होती. ज्यामुळे या सोडतीबाबत “उदासीनतेचे” वातावरण […]

अधिक वाचा..

Video; जीवंतपणी आशा तुटल्या, मृत्यूनंतरही उजेड नाही ‘दत्तक’ गावातील स्मशानभुमीची दुरावस्था

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील गुनाट हे गाव विद्यमान आमदार माऊली कटके यांनी काही महिन्यांपुर्वी मोठ्या गाजतवाजत ‘दत्तक’ घेतल्याची घोषणा करत “गावाचा सर्वांगीण विकास करणार” असा शब्द दिला होता. पण आज या दत्तक गावातील स्मशानभुमी मात्र अंधार, दुर्गंधी आणि दुर्लक्षाचे प्रतीक बनली आहे. रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गुनाट येथील थोरात कुटुंबातील एका वृद्ध […]

अधिक वाचा..

Video; घोडनदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर, चिंचणी–बोरी ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी आणि श्रीगोंदा तालुक्यातील बोरी या दोन गावांना जोडणाऱ्या घोडनदीवर ७५ वर्षे होऊन अद्यापही दळणवळणासाठी कायमस्वरुपी पुल नाही. त्यामुळे ग्रामस्थांना रोज याठिकाणी प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतो. पावसाळ्यात तर ही परिस्थिती अधिक गंभीर बनते. घोड धरणातुन पाणी नदीपात्रात सोडल्यानंतर  या दोन्ही गावांमधील संपर्क पुर्णपणे तुटतो. चिंचणी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात आज रविवार दि १२ ऑक्टोबर २०२५ सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपुर्ण परीसर हादरला आहे. आज सकाळी ९:४५ च्या सुमारास भरदिवसा बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे (वय ५ वर्षे ६ महिने) या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेच्या वेळी तिचे आजोबा अरुण देवराम बोंबे हे त्यांच्या घरामागील शेतात जेसीबीने काम […]

अधिक वाचा..
parodi-temgire

शिरूर! पारोडीमध्ये ‘पिरसाहेब गुळ उद्योग समूह’चा शुभारंभ…

पारोडी (शिरूर): पारोडी येथील युवा उद्योजक अभिजीत तुकाराम टेमगिरे यांनी “पिरसाहेब कृषी सेवा केंद्र” या यशस्वी व्यवसायानंतर आता “पिरसाहेब गुळ उद्योग समूह” या नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई मंगलदास बांदल तसेच ज्ञानेश्वरी उद्योग समूह प्रा. लि. कंपनीचे चेअरमन आणि आव्हाळवाडी ग्रामपंचायतचे […]

अधिक वाचा..