पारोडी (शिरूर): पारोडी येथील युवा उद्योजक अभिजीत तुकाराम टेमगिरे यांनी “पिरसाहेब कृषी सेवा केंद्र” या यशस्वी व्यवसायानंतर आता “पिरसाहेब गुळ उद्योग समूह” या नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई मंगलदास बांदल तसेच ज्ञानेश्वरी उद्योग समूह प्रा. लि. कंपनीचे चेअरमन आणि आव्हाळवाडी ग्रामपंचायतचे सदस्य काकासाहेब रामराव सातव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी डोमखेल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत सातव पाटील, अशोकराव आप्पा सातव पाटील, पारोडीचे माजी सरपंच रामभाऊ सातकर, चिंतामण टेमगिरे, भानुदास टेमगिरे, कैलास नाना टेमगिरे, स्वप्नील टेमगिरे, विलास येते, गिताराम कोकरे, चंद्रकांत कोकरे, आबासाहेब ढमढेरे, विद्यमान सरपंच लालासाहेब येळे, माजी उपसरपंच बापूसाहेब येळे, ग्रामपंचायत सदस्य कैलासशेट कोकरे, संभाजी टेमगिरे, रविदादा टेमगिरे, लक्ष्मण येळे, नाना पाटील टेमगिरे, शरद पाटील टेमगिरे, कैलास शेळके, राजूभाऊ टेमगिरे, अविनाश टेमगिरे, माऊली टेमगिरे, अरुण भालेराव, अमोल भालेराव, मोहन भालेकर, चेअरमन दौलतनाना टेमगिरे, शहाजी टेमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना रेखाताई बांदल म्हणाल्या, “तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यात उतरावे आणि स्वावलंबी बनावे.” काकासाहेब सातव यांनी स्वतःचा संघर्षमय प्रवास सांगत, “कष्टाशिवाय पर्याय नाही; समाजासाठी काहीतरी परत देणे हीच खरी यशाची ओळख आहे,” असा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविदादा टेमगिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संभाजी टेमगिरे यांनी मानले. दरम्यान, या नव्या उद्योगामुळे पारोडी परिसरातील तरुणांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पारोडी येथील शेतकरी कुटुंबातील कुणाल कवितकेचे मोठे यश…
शिरुर; पारोडीत वीज पडून दुमजली बंगल्याचे नुकसान घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक
शिरुर तालुक्यातील पारोडीत उभारतेय नक्षत्र वन
पारोडीमध्ये आढळलेल्या जखमी कोल्ह्याला जीवदान
शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य