धक्कादायक; बेल्हा-जेजुरी महामार्गावरील एस टी चालक-वाहकास दमदाटी करत मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबुत (ता.शिरुर) गावच्या हद्दीतील बेल्हा-जेजुरी महामार्गावरील पंचतळे येथे गुरुवारी (दि २९) शिरुर-नारायणगाव एस टी बस च्या चालक व वाहकास मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत एसटी बस चालक कुंडलीक ज्ञानदेव गाडीलकर यांनी राहुल सोनवणे (रा.जांबुत) याच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  जांबुत गावच्या हद्दीतील पंचतळे येथील चौकात एस […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांनी आमदार पवार यांचा वाढदिवस साजरा

शिरुर (तेजस फडके) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य हे नेहमी समाजाचा हिताचे असते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व महिला भगिनींनी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले. त्या सर्वांचे मी खुप आभार मानतो. तसेच शाळेतील मुलांनी चांगला अभ्यास करुन स्वतःचे भवितव्य घडवले पाहिजे असे प्रतिपादन शिरुर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांनी केले. शिरुर येथील […]

अधिक वाचा..

संतापजनक ; सात म्हशींची एकाच गाडीतुन कृरपणे वागणुक देऊन वाहतूक केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) एका टेम्पोमध्ये सात म्हशी कृरपणे कोंबुन त्यांना कोणत्याही प्रकारच्या चारापाण्याची व्यवस्था न करता तसेच जनावरांची वाहतुकीपुर्वी वैदयकीय तपासणी करणे बंधनकारक असताना जनावराची वैदयकीय तपासणी न करता वाहतुकीकरीता घेवुन चालल्याप्रकरणी १) सलीम आजीज पठाण रा. राहु, ता. दौंड, जि. पुणे यांच्या सांगण्यावरुन २) संजय विश्वनाथ कोथंबिरे (वय ४८) ३) सलिम मुस्ताक शेख (वय […]

अधिक वाचा..

दुर्दैवी; शिरुर तालुक्यातील निमोणे गावात साप चावल्याने दोन वर्षाच्या मुलीचा उपचारापुर्वी मृत्यू

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावात मजुरी करण्यासाठी आलेल्या बिहार येथील कुटुंबातील दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असुन याबाबत मुलीच्या वडिलांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरवार दि २९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास फिर्यादी विमलकुमार बहादुर राम (वय २७) सध्या रा. […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर अनोळखी महीलेला अज्ञात वाहनाची धडक, मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान

शिरुर (अरुणकुमार मोटे ) पुणे-नगर रस्त्यावरील सदरवाडी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत न्हावरे फाटा, कानिफनाथ मंदिर येथे अज्ञात वाहनाने एका अनोळखी महीलेला (वय अंदाजे 30 ) धडक दिली असुन वाहनचालक वाहनासहीत पळून गेला आहे. या धडकेत महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान शिरुर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि २६) […]

अधिक वाचा..

शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाटजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाट गावच्या हद्दित मंगळवार (दि २७) रोजी पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जागीच ठार झाला. सकाळी ही घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनी शिरुर वनविभागाला याबाबत माहिती दिली. गुनाट-निर्वी गावच्या शिवेजवळ फंड वस्तीनजीक पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत पावल्याचे समजल्यानंतर मंगळवार (दि २७ ) सकाळी ग्रामस्थांनी याठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटा येथील जगताप कुटुंबातील तीन भावंडांनी शाळेसाठी केली लाखों रुपयांची जमीन दान

मांडवगण फराटा (संपत कारकुड) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथील जगतापवाडी तील तीन भावंडांनी गोर-गरीबांच्या मुलांना घराजवळच प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी शाळेला तब्बल सात गुंठे जमीन बक्षीसपत्र करुन दान केली आहे. मांडवगण परीसरात शेत जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना शाळेसाठी सात गुंठे जमीन बक्षीसपत्र करुन दान केल्याने जगताप कुटुंबियांवर आसपासच्या परीसरातुन कौतुकाचा वर्षाव […]

अधिक वाचा..

जांबुत; बिबट्याच्या हल्यात महिलेचा मृत्यू ग्रामस्थ आक्रमक, गाव बंद ठेवुन पदयात्रा काढत केला रास्ता रोको

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील जांबूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात ५५ वर्षीय मुक्ताबाई खाडे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि २६) रोजी घडली. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षांतील मृत्यूची ही पाचवी घटना आहे. मात्र वनविभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने ग्रामस्थांसह नातेवाईकांनी वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती; मुलींनो चंद्रासारख्या शितल नाही तर सुर्या सारख्या प्रखर बना, पोलिस निरीक्षक अनिता खेडकर

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) सध्या सोशल मिडियाचा ट्रेंड असुन शाळकरी तसेच कॉलेजच्या मुलीं सोशल मिडीयावरील आभासी दुनियेत अडकून प्रेमाच्या जाळ्यात फसतात. परंतु मुलींनो चंद्रासारख्या शितल नाही तर सुर्या सारख्या प्रखर बना आणि समोर येणाऱ्या वाईट प्रवृत्तीचा सामना करायला शिका असे प्रतिपादन पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस निरीक्षक अनिता खेडकर यांनी केले. रांजणगाव गणपती (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

जांबुत येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांसह नातेवाईकांचा नकार

शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबुत (ता. शिरुर) येथे सोमवारी (दि २६) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई भाऊ खाडे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जांबुत ग्रामस्थांनी आक्रमकतेचा पवित्रा घेत वनविभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला असुन नातेवाईक व कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास थेट नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे. गेली दोन वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात […]

अधिक वाचा..