Shirur Police Station

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीचा प्रभाव; शिरुर न्यायालयाने केली नियमित बंदुकधारी पोलिसाची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) गेल्या आठ दिवसात शिरुर न्यायालयाच्या आवारात एका माजी उपसरपंचाने शिविगाळ, तर मित्र-मैत्रीणीमध्ये हाणामारी अशा गंभीर घटना घडल्या होत्या. त्यामुळे शिरुर न्यायालयाची सुरक्षा ऐरणीवर असल्याबाबतच्या सडेतोड बातम्या ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्यांची दखल घेऊन शिरुर न्यायालयाने शिरुर पोलिस स्टेशनला सुरक्षेसाठी नियमित बंदुकधारी पोलिसाची मागणी केली आहे.   गेल्या […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचांच्या धिंगाण्यानंतर पुन्हा मित्र-मैत्रिणीची हाणामारी….

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर न्यायालयाच्या आवारात शिरुर तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने दारु पिऊन धिंगाणा घालुन शिविगाळ करण्याची घटना ताजी असतानाच पुन्हा न्यायालयासमोर मित्र-मैत्रिणीमध्ये हाणामारी झाल्याची घटना (दि १८) जुलै रोजी घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयाची सुरक्षा ऐरणीवर असल्याचे दिसून येत आहे.   याबाबत सविस्तर माहीती अशी की, एका २२ वर्षीय महीलेचे (रा. श्रीरामपुर, जि.अहिल्याअनगर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील करडे गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरु; जनतेतुन सरपंचपदासाठी अनेकजण इच्छुक

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील ७ सार्वत्रिक ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या असुन त्या सात ग्रामपंचायत मध्ये करडे गावचीही पंचंवार्षिक निवडणुक होत आहे. करडे ग्रामपंचायतसाठी इतर मागास प्रवर्ग महिला (OBC) आरक्षण असुन गावातील अनेकजण सरपंचपदासाठी इच्छुक असुन गावातील माजी सैनिक नंदकिशोर रोडे यांच्या पत्नी पुष्पा रोडे यांच्यासह अनेकजण ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत.   करडे […]

अधिक वाचा..

शिरुर येथे राष्ट्रवादी (शरद पवार गट) व रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप

शिरुर (अरुणकुमार मोटे) पंढरपूर येथे सर्व भाविक आषाढी एकादशी निमित्त दर्शन घेण्यासाठी जात असतात, प्रत्येकाला वाटते तिथे जाऊन दर्शन घ्यावे, परंतु काहींना परिस्थितीमुळे शक्य होत नाही. देव हा माणसातच आहे, तुम्ही सर्व महिला या देवच आहात, कधीही काही अडचणी आल्या तरी तुम्ही नेहमी घरच्यासारखे येऊन सांगत जा. महिलांच्या ज्या सरकारी योजना आहेत त्या बाबत सर्वांना […]

अधिक वाचा..

शिरुर न्यायालयाच्या आवारात माजी उपसरपंचाचा दारु पिऊन धिंगाणा; पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला असुन काही महिन्यांपुर्वी शिरुर न्यायालयाच्या आवारात एका माजी सैनिकाने स्वतःच्या पत्नीवर गोळ्या झाडत तिची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.   काल मंगळवार (दि १६) रोजी दुपारी ५ च्या सुमारास करडे (ता. शिरुर) येथील माजी उपसरपंच आणि […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

दिलीप वळसे पाटील यांच्या तत्परतेमुळे वाचला एकाचा प्राण…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला विषारी साप चावला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान एका इंजेक्शनची आवश्यकता होती. महाराष्ट्र राज्यांचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे रुग्णाचा प्राण वाचला आहे. शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील ताराचंद (काका) कोहकडे यांना शेतात काम करत असताना घोनस जातीचा साप चावला होता होता. विषारी साप चावल्याने त्यांना […]

अधिक वाचा..
shirur-dashkriya

शिरूर शहरातील दशक्रिया विधीघाट झालाय जुगार आणि दारू पिणाऱ्यांचा अड्डा…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरातील दशक्रिया विधीघाट झालाय जुगार खेळणारे व दारू पिणाऱ्यांचा अड्डा झाला आहे. यामुळे तेथे अस्वच्छता पसरली असून दशक्रिया साठी येणाऱ्या बाहेर गावाहून आलेले नातेवाईक व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिरूर नगरपालिकेने या प्रकाराची दखल घेऊन कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी कर्मचारी ठेवण्याची मागणी केली आहे. शिरूर शहरातील कुंभारघाट येथे हिंदू धर्माचे दशक्रिया […]

अधिक वाचा..

शिरुरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप, विनापरवाना झाडे पाडत केले बांधकाम; कारवाई करा, नागरीकांची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता. शिरुर) येथील गट न.२६७ मध्ये वनविभागाची परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने निलगिरी, सिसम, लिंब अशी दहा झाडे पाडुन अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत वृक्षप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला असुन कोणतीही परवानगी न घेता मोठी झाडे तोडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांवर वनविभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. याबाबतची माहीती […]

अधिक वाचा..

शिरुर-पाबळ रस्त्यासाठी होतोय चक्क मातीचा वापर; सार्वजनिक बांधकाम उपविभाग निद्रीस्त

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील पाबळफाटा ते मोती नाला राज्य मार्ग १०३ या रस्त्याचे काम सुरु असुन ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असुन या कामाच्या साईडपट्ट्या भरण्यासाठी मुरुमाऐवजी मातीचा वापर होत आहे. शिरुरचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय हे दोन किलोमीटरच्या अंतरावर असुनही तेथील आधिकाऱ्यांना या रस्त्याचे काम पाहायला वेळ नाही का…? असा संतप्त सवाल वाहनचालकांकडुन […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यातील आनंद नागरी पतसंस्थेत तब्बल १७ कोटींचा अपहार; गुन्हे दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील नामांकीत असणाऱ्या आनंद नागरी सहकारी पतसंस्थेत तेथील संचालक मंडळ व लेखा परीक्षकांनी संगनमताने तब्बल सतरा कोटी रुपयांचा अपहार करुण ठेवीदारांची मोठी आर्थिक फसवणुक केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये पतसंस्थेच्या संचालक मंडळासह चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिरूर येथील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदार पैसे […]

अधिक वाचा..