शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. येथील ग्रामपंचायत कर्मचारी भरत पोपट गायकवाड याला लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, कान्हूरमेसाई येथील तक्रारदाराच्या जागेवर काही व्यक्तींनी […]

अधिक वाचा..
pratiksha-thube-rupika-narker

शिरूर तालुक्यातील १००% दिव्यांग व्यक्तीचे घर पाडण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती…

शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील एका १००% दिव्यांग व्यक्तीचे घर पाडण्याच्या प्रशासनाच्या हालचालींना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. अभय जे. मंत्री यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा आदेश दिला असून, यामुळे एका गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. पिंपरखेड येथील रहिवासी तुकाराम दशरथ पवार हे पारंपरिक लोहार […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सरदवाडीत ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ जनजागृतीचा अनोखा उपक्रम

शिरूर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी ता. शिरूर येथे स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत सरदवाडी, इन्हेलर इंडिया लिमिटेड व नोहाऊ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ या विषयावर भारुडाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भारुड सम्राट ह. भ. प. अनिल महाराज सावळे (मुळशीकर) यांनी […]

अधिक वाचा..
sand-mafia

Video! सर्कल ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर वाळू माफियांचा ‘रात्रीचा खेळ’; प्रशासन मौन, कारवाई कधी?

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील टाकळी भिमा-म्हाळुंगी डॅम परिसरात वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वडगाव बांडे सर्कल ऑफिसच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा सारा सावळागोंधळ सुरु असूनही प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नदीपात्राची होत असलेली लूट आता उघडपणे सुरु असल्याने नागरिकांमध्ये […]

अधिक वाचा..
shikrapur-malthan-road

शिक्रापूर-मलठण रस्ता नियोजनाच्या अभावामुळे बनलाय मृत्यूचा सापळा!

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) शिरूर  : शिक्रापूर ते मलठण रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. पण, ठेकेदाराच्या नियोजनच्या अभावामुळे रस्ता मृत्यूचा सापळा बनत आहे. रस्त्यावर दिवसेंदिवस अपघात होताना दिसत आहेत. परंतु, ठेकेदाराला कशाचे काही पडले नाही. संबंधित ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे, अशी माहिती समाजिक कार्यकर्ते आणि वाघाळे गावच्या विकास सोसायटीचे संचालक अशोक सोनवणे यांनी दिली. […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यातील दुहेरी बालहत्याप्रकरण उघड…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात घडलेल्या दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. दोन्ही घटनांमागे एकच आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पहिली घटना… २१ जून २०२४ रोजी १० वर्षाच्या मुलाचा शेतात संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी डोक्यावर जखम असल्याने बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, वनविभागाने हा हल्ला नसल्याचे स्पष्ट […]

अधिक वाचा..
ashok-kharat

Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण…

शिरूर (तेजस फडके): नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, अशाच एका व्हिडिओमध्ये शिरूर तालुक्यातील काही नामांकित राजकीय पुढाऱ्यांची उपस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित व्हिडिओ शिरूर तालुक्यात व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. शिरूर तालुक्याच्या राजकीय […]

अधिक वाचा..

शिरुर; पिंपरखेडच्या सौम्याचे उज्ज्वल यश, नवोदय विद्यालयासाठी निवड, सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी सौम्या सुनील वरे हिने शैक्षणिक वर्ष सन २०२५-२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत नवोदय विद्यालयासाठी आपली निवड निश्चित केली आहे. तिच्या या यशामुळे शाळेसह संपूर्ण गावाची मान उंचावली असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत […]

अधिक वाचा..

रांजणगाव एमआयडीसीत अंमली पदार्थांवर मोठा छापा; ६.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी व धडक कारवाई करत तब्बल ६ लाख ८० हजार रुपये किमतीचा एमडी (अंमली पदार्थ) जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यात सुरू असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

Video! शिरूर तालुका हादरला! चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू; घटनाही अगदी तशीच…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मुलाच्या डोक्यावर खोल जखम आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दीड वर्षांपूर्वी तशीच घटना […]

अधिक वाचा..