sagar-shinde-kanhur

शिरूर! दुष्काळी डोंगररांगांमधून सागर शिंदे यांची यशाची भरारी

शिरूर तालुका

पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व डोंगराच्या कोपऱ्यात वसलेले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर सागर सखाराम शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातील स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदावर निवड मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

सागर शिंदे यांनी कोणत्याही मोठ्या शहरातील क्लासेसचा आधार न घेता घरच्या घरी अभ्यास करून हे यश संपादन केले. ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा, दुष्काळी परिस्थिती आणि विविध अडचणींवर मात करत त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर सरकारी सेवेत स्थान मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे गारकोलवाडीसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांसाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते,” हे सागर शिंदे यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

दरम्यान, सागर शिंदे यांच्या निवडीबद्दल गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध सामाजिक संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.”संघर्ष हरवतो पण आयुष्य घडवतो” या उक्तीचा प्रत्यय सागर शिंदे यांच्या यशामुळे पुन्हा एकदा आला आहे.

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर! वरुडे येथील आरोपीचे स्टेटस; लवकरच एकाचा मर्डर करून जेलमध्ये जाणार…

Video: शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून डोळ्यात मिरची पुड टाकत जीवघेणा हल्ला…

नवे पोलीस निरीक्षक, जुन्याच समस्या राहणार का? शिरूर तालुक्यात ‘ॲक्शन’ची प्रतीक्षा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत