Video : घोड धरण लुटले जात असताना अधिकारी गप्प, महसूल यंत्रनेची कारवाई फक्त नावापुरती…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील घोड धरण परिसरात सुरु असलेला बेकायदेशीर वाळू उपसा “लपूनछपून” नव्हे, तर सर्वांच्या डोळ्यासमोर सुरु आहेत. तरीही महसुल विभागातील अधिकारी, पोलिस आणि स्थानिक राजकीय पुढारी यांची भुमिका संशयास्पद ठरत असून, ही मंडळी नेमकी कोणाच्या हितासाठी काम करत आहेत…? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. View this post on Instagram View […]

अधिक वाचा..

घोडनदी येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे भव्य उद्घाटन

शिरुर (तेजस फडके): घोडनदी (ता.शिरुर) येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे तसेच अरिफ डॉक्टर यांच्या शुभहस्ते रविवार (दि 25) रोजी संपन्न झाले. या ऐतिहासिक प्रसंगी न्यायव्यवस्थेतील मान्यवर, वकील बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड उदय सरोदे यांनी […]

अधिक वाचा..

कारेगाव-रांजणगाव पंचायत समिती गणात नाणेकर-सोनवणे यांच्यामुळे सत्ताधाऱ्यांची झोप उडणार…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव-रांजणगाव पंचायत समिती गणात यंदा निवडणूक नाही, तर थेट बंड उसळले आहे. वर्षानुवर्षे पैसा, सत्ता आणि राजकीय मसल पॉवरच्या जोरावर निवडणुका जिंकणाऱ्यांसमोर आता सर्वसामान्य कार्यकर्ते छातीठोकपणे उभे ठाकले आहेत. आणि म्हणूनच हा गण संपूर्ण तालुक्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कारेगाव पंचायत समिती गणातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय […]

अधिक वाचा..

कारेगाव गणात ‘तुतारी’ विरुद्ध ‘घड्याळ’ शरद पवार आणि अजित पवार गटाचे उमेदवार थेट आमने-सामने

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजताच शिरुर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फाटाफुटीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेत दोन्ही गटांनी समन्वय साधत एकत्र निवडणुक लढवण्याचा प्रयत्न केला.पण तरीही शिरुर तालुक्यात कारेगाव पंचायत समिती गण हा त्याला अपवाद ठरत आहे. या गणात शरद पवार […]

अधिक वाचा..
domkhel-school

फुलगाव येथे जिल्हास्तरीय कवितागायन स्पर्धेत डोमखेल शाळेला द्वितीय क्रमांक!

पुणे: यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय कवितागायन स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (ता. २०) फुलगाव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत वाघोली केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोमखेल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यांत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामागे हवेली तालुक्याचे कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे, विस्तार अधिकारी श्री. मुंडे, केंद्रप्रमुख श्रीमती प्रज्ञा बांदल आणि केंद्रसमन्वयक […]

अधिक वाचा..

खाकी वर्दीतील पोलिसच निघाला ड्रग्स रॅकेटचा दरोडेखोर

गुजरच्या ‘श्याम’ चे सुंदर कारनामे होणार उघड शिरूर (अरुणकुमार मोटे): केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाला मोठा धक्का देणारे आणि संपूर्ण राज्यातील पोलीस यंत्रणेला हादरवून सोडणारे एक धक्कादायक प्रकरण पुणे ग्रामीण जिल्ह्यात शिरूर येथे उघडकीस आले आहे. शिरूर तालुक्यात तब्बल वीस कोटी रुपये किमतीच्या एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्स प्रकरणात थेट पोलीस कर्मचारीच मास्टरमाइंड असल्याचे निष्पन्न झाले असून, […]

अधिक वाचा..

शिरुर; दौलत शितोळे यांना ‘मिलेनियर लाईफस्टाईल अवॉर्ड

आपत्ती व्यवस्थापन संघाच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय गौरव शिंदोडी (तेजस फडके): ‘द मिलेनियर क्लब, दुबई’ यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘मिलेनियर लाईफस्टाईल अवॉर्ड’ यंदा आपत्ती व्यवस्थापन संघाचे संस्थापक/अध्यक्ष दौलत उमाजी शितोळे यांना जाहीर करण्यात आला आहे. गेल्या एक दशकाहून अधिक काळ आपत्ती व्यवस्थापन संघाच्या माध्यमातून हजारो नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या भरीव व निःस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेत हा […]

अधिक वाचा..

ड्रग्ज रॅकेटमध्ये नगरचा पोलीसच मुख्य सूत्रधार

जप्त केलेला एमडी ड्रग्जचा मुद्देमाल काळ्या बाजारात विकल्याचा गंभीर आरोप शिरूर (अरुणकुमार मोटे):  पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या तब्बल २० कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज प्रकरणाने राज्याच्या पोलीस यंत्रणेला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारीच ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा धक्कादायक खुलासा झाला असून, श्यामसुंदर रामदास […]

अधिक वाचा..

अखेरच्या दिवशी शक्तीप्रदर्शनाची धग; शिरूर तहसील परिसरात जत्रेचे वातावरण

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिरूर तालुक्यात राजकीय वातावरण अक्षरशः तापले होते. सर्वच प्रमुख पक्षांसह अपक्ष इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केल्याने तहसील कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. ढोल-ताशे, घोषणा, वाहनांच्या रांगा आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी यामुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. शिरूर […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDCचा विकास की प्रदूषणाची शिक्षा? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते काय…

शिरूर: रांजणगाव एमआयडीसीमुळे शिरूर तालुक्यात गुंतवणूक आणि रोजगाराचे दार उघडले, मात्र त्याची किंमत आता शेतकरी आणि सामान्य नागरिकांना जीवावर येण्यासारखी मोजावी लागत आहे. रासायनिक प्रदूषणामुळे ओढ्यांचे पाणी दूषित होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून या पाण्याचा थेट फटका गावातील पिकांना आणि आरोग्याला बसत आहे. पिकांचे नुकसान, जमिनीची सुपीकता कमी होणे, जनावरांवर परिणाम अशा अनेक अंगांनी […]

अधिक वाचा..