चिंचणी येथील आबा धावडे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी गावातील आबा धावडे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद तसेच शिरुर बेट मंडळचे अध्यक्ष राहुल पाचर्णे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.   आबा धावडे हे गेल्या २० वर्षांपासुन लोकनेते माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे तसेच भाजपाचे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांचे आव्हान, डीजे व डॉल्बीला परवानगी नाही, पारंपरिक पद्धतीने साजरा करा गणेश विसर्जन

शिक्रापूर (ओमकार भोरडे): गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलिस स्टेशनने हद्दीतील सर्व गणेश मंडळांना महत्त्वाची सूचना दिली आहे. उत्सव काळात डीजे, डॉल्बी, लेझर लाईट आदींवर संपूर्ण बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. गावातील गणेशोत्सव शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने […]

अधिक वाचा..

गणपती मंडळाच्या सहकार्याने कवठे येमाई येथे भव्य संजय गांधी निराधार योजना शिबिर संपन्न

७६ लाभार्थ्यांचे अर्ज प्रक्रिया पूर्ण; शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळविण्याकडे मोठे पाऊल शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई गावात सामाजिक कार्याचा वसा जोपासणाऱ्या श्री गुरुदेवदत्त फ्रेंडशिप ग्रामविकास प्रतिष्ठान, कवठे या गणपती मंडळाने (दि. २) सप्टेंबर २०२५ रोजी एक भव्य संजय गांधी निराधार योजना शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या सामाजिक […]

अधिक वाचा..

Video; रांजणगाव गणपतीत मराठा बांधवांचा गुलाल उधळून जल्लोष

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश मिळाले असून सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. या ऐतिहासिक विजयाची बातमी कळताच शिरुर तालुक्यात उत्साहाची लाट उसळली. रांजणगाव गणपती येथील बस स्थानक परिसरात मराठा बांधवांनी मोठ्या आनंदात जल्लोष साजरा केला. गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात आंदोलकांनी आपला आनंद […]

अधिक वाचा..

पिंपळे जगताप ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील भारतगॅस कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाने संबंधित रस्त्याचे प्रत्यक्ष काम हाती घेतले असुन त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये उद्योजक श्रीपाद जगताप यांच्या नेतृत्वाखाली चक्री उपोषण छेडण्यात आले होते. या आंदोलनाला जातेगाव […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्दमध्ये गणेशोत्सवानिमित्त २०० झाडांचे वाटप करत सीसीटीव्ही बसविण्याचा संकल्प

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल तसेच शिक्रापुर पोलीस स्टेशन यांनी केलेल्या आवाहनानुसार गावातील तसेच परिसरातील नागरिकांना २०० झाडांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच, उर्वरित वर्गणीचा उपयोग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी आरोग्य केंद्रातील मुजोर डॉक्टरवर कारवाईचा प्रश्न अनुत्तरितच

बेट परीसरातील नागरिकांचा संताप शिगेला शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्र हे आजारपणाच्या, अपघाताच्या काळात लोकांना दिलासा देण्याऐवजी मृत्यूचे केंद्र ठरत चालले आहे. कारण या आरोग्य केंद्रावर नियुक्त असलेली वैद्यकीय अधिकारी फक्त नावालाच हजेरी लावून लगेच शिरूरला रवाना होते. दिवसभर रुग्णालय कर्मचार्यांच्या जीवावर रामभरोसे सुरू असते. कर्तव्यात कसूर, शिस्तभंग व कामचुकारपणा […]

अधिक वाचा..

पारगाव–पुणे एसटी सेवा पुन्हा सुरू; गणेगाव खालसा ग्रामस्थांकडून चालक–वाहकांचा सन्मान

शिरूर (ओमकार भोरडे): काही दिवसांपूर्वी थांबलेली पारगाव–मंगरूळ–जांबुत–मलठण–शिक्रापूर–वाघोली–पुणे ही एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिरूर आगारातून धावणारी ही गाडी आता टपालसेवाही नेणार असल्याने ती “टपाल गाडी” म्हणूनही ओळखली जाणार आहे, अशी माहिती चालक गणेश पलांडे व वाहक दत्तात्रय डोळस यांनी दिली. या गाडीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नोकरी–धंद्यासाठी जाणाऱ्या कामगारांना तसेच […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात गौरीचे उत्साहात आगमन

शिरूर (अरुणकुमार मोटे): गणेशोत्सवात गौरी-गणपतींच्या आगमनाने शिरूर तालुक्यातील गावागावांत पुन्हा एकदा उत्साह, भक्तिभाव आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: महिलांच्या सहभागातून या उत्सवाला वेगळे पारंपरिक स्वरूप प्राप्त झाले आहे. गौरीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे पूजन करण्याची प्रथा असून यासाठी परसरातील महिलांना विशेष निमंत्रण देण्यात येते. माहेरी आलेल्या गौरीला पारंपरिक साजशृंगार करून तिच्या सोबत […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे रक्तदान शिबिरात ६१ जणांचा उत्स्फूर्त सहभाग

शिरूर (अरुणकुमार मोटे): रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या सामाजिक संदेशाला उजाळा देत सविंदणे (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रविवारी (ता.३१) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका पूर्वाताई दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूर-आंबेगाव महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा व माजी सरपंच शुभांगी पडवळ यांच्या पुढाकारातून हे […]

अधिक वाचा..