शिरुरच्या नेमबाजांचा राज्यस्तरावर डंका समृद्धीला रौप्य तर श्रावणीला कांस्यपदक

शिरुर (अरुणकुमार मोटे) नागपुर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरुर तालुक्याच्या दोन मुलींनी नेमबाजी प्रकारात कौतुकास्पद मिळवलं आहे. शिरुरच्या युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या समृद्धी अजय चव्हाण तसेच श्रावणी संतोष वाळके यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळवत शिरुरचा झेंडा राज्यस्तरावर फडकावला आहे. या स्पर्धेत १० मीटर पिप साईट एअर रायफल या प्रकारात […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘एकता दौड’

रांजणगाव गणपती (तेजस फडके) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दिवस (Run For Unity) या घोषवाक्याखाली रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या वतीने “एकता दौड मॅरेथॉन” स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत पार पडलेल्या या मॅरेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शालेय विद्यार्थी, […]

अधिक वाचा..
koregaon-bhima-bus-fire

शिरूर! कोरेगाव भीमा येथे खाजगी बसला भीषण आग…

कोरेगाव भीमा (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ आज (गुरुवार) आठवडे बाजाराच्या दिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एका खाजगी कंपनीच्या बसने अचानक पेट घेतला. यामुळे महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कोरेगाव भीमा येथे आठवडे बाजार होता आणि रस्त्यावर मोठी […]

अधिक वाचा..

रांजणगाव एमआयडीसी पोलीसांकडून सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रमाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभुमीवर नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत जागरुक करणे आणि फसवणुकीपासुन बचाव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक प्रशांत ढोले तसेच रांजणगाव […]

अधिक वाचा..
ranjgaon-police

शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) दुपारी एक भावनिक प्रसंग घडला. हरवलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याला सुखरुपपणे त्याच्या आईच्या ताब्यात देताना पोलिस अधिकारी आणि महिला अंमलदार यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत एका रिक्षावाल्याला तीन वर्षाचा मुलगा सापडला. पण त्याला कुठं राहतो, आई-वडील कोण याबाबत काहीही सांगता […]

अधिक वाचा..
Onion

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…

शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान पंचनामा आणि ऑनलाइन पीक पाहणी करण्यासाठी तलाठी गावात येण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. संबंधित तलाठी गावात न येता उलट मोबाईलवरून शेतकऱ्यांशी आरेरावीच्या भाषेत बोलत असल्याची तक्रार वाघाळे (ता. शिरूर) गावातील ग्रामस्थांनी केली आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, ‘पावसामुळे आमचे पीक वाया गेले, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पारोडी गावात उद्या पिरसाहेबांची यात्रा

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली सुप्रसिद्ध पिरसाहेबांची पारंपरिक यात्रा उद्या मंगळवार (दि २८) ऑक्टोबर रोजी दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरी होणार असुन या यात्रेला राज्यभरातुन दरवर्षीप्रमाणे हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. पारोडी येथील पिरसाहेब यात्रेची सुरुवात सोमवारी मध्यरात्री १२ च्या दरम्यान पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुक निघाल्यानंतर संदल होणार आहे. त्यानंतर फुलांची […]

अधिक वाचा..

चिंचणीच्या जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना

शिंदोडी (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी अक्षय पवार, उपाध्यक्षपदी हेमंत गवळी, कोषाध्यक्षपदी महेश उपाध्ये यांची निवड करण्यात आली. तर संघाचे सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक बापू रायकर यांची निवड करण्यात आली. […]

अधिक वाचा..
Leader

शिरूर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी…

पाबळ (सुनिल जिते) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चिती झाल्याने तयारी सुरु झाली असून, राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य बनण्याची स्वप्न उराशी बाळगून असलेल्या इच्छुक आपापल्या गट व गणात मोर्चे बांधणी करत आहेत. नेत्यांच्या निवडणुकीकरिता युती आघाडीचा फार्मूला अवलंबला जातो. परंतु, स्थानिक […]

अधिक वाचा..

शिंदोडी विकासोच्या वतीने सभासदांना ८ लाख ७१ हजारांचा लाभांश वाटप

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सभासदांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि विश्वासार्ह ठरत असुन आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे संस्थेने सभासदांना एकूण ८ लाख ७१ हजार ७९६ रुपयांचा लाभांश जाहीर करत तो लाभांश सभासदांच्या खात्यात वितरित करण्यात आला. हा लाभांश संस्थेचे संस्थापक व संचालक आणि शिंदोडी गावचे माजी […]

अधिक वाचा..