शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ढाकी वस्ती परिसरात रविवारी (ता. १४) सायंकाळी गाईचा पाठलाग करताना एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. मात्र, विहिरीतील पाण्याची पातळी जास्त असल्याने आणि वीजपंपाच्या पाईपच्या साहाय्याने बिबट्याने विहीरीतून वर येत शिताफीने पलायन केले.
कवठे येमाई येथील ढाकी वस्तीवरील सोपान मुखेकर यांच्या मालकीच्या विहिरीत हा प्रकार घडला. सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास गाई चरत असताना बिबट्याने अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा करून त्याला पिटाळल्यावर तो पळत जाऊन मुखेकर यांच्या विहिरीत पडला. विहिरीत पडल्यावर बराच वेळ बिबट्या पाण्यातील वीजपंपाच्या पाईपला पकडून राहिला. पाण्याची पातळी वर असल्याने त्याने पाईपच्या साहाय्याने सुमारे आठ फूट उडी मारत बाहेर येऊन जंगलाच्या दिशेने पलायन केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्यात वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असून शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी हौशीराम मुखेकर, मनोज मुखेकर, सागर मुखेकर, नितीन मुखेकर, मोहन मुखेकर आणि राजेंद्र मुखेकर यांनी केली आहे.
शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू…
Video: वाघाळे गावात बिबट्याने पोल्ट्री फार्ममधून पाळीव कुत्रा नेला उचलून…
करडे गावात मध्यरात्री घायतडक वस्तीवर घरात घुसून बिबट्याचा श्वानावर हल्ला…
शिरूर तालुक्यात बिबट्यांसाठी कृत्रिम जंगल केले जाणार विकसीत; कोठे पाहा…
बिबट्याची दहशत! पिंपरखेडमधील महिलांनी स्वरक्षणासाठी गळ्यात घातला टोकदार खिळ्यांचा पट्टा…