fakate-youth

शिरूर तालुक्यातील युवकांनी रस्त्याच्या कामासाठी उगारले उपोषणाचे अस्त्र…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात दळणवळण, उसवाहतूक व दुग्धवाहतूक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अनेक रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी फाकटे (ता. शिरूर) येथील युवकांनी थेट उपोषणाचे अस्त्र उगारले आहे.

दोन दिवसांपासून या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा हि आग्रही मागणी या तरुणांची असून पाठपुरावा करूनही जर या विकासकामांबाबत कोणता निर्णय झाला नाही तर आपण जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. अनेक ग्रामस्थ, संघटना व पदाधिकारी यांनी या उपोषणाला पाठींबा दर्शविला असून माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, अरुणा घोडे यांनी उपोषणस्थळी भेटी दिल्या आहेत.

फाकटे, वडनेर खुर्द आणि चांडोह या रस्त्यांच्या मागणीबरोबरच गेली अनेक दिवसांपासून रुंदीकरणासाठी व डांबरीकरणासाठी प्रतीक्षेत असलेल्या पिंपरखेड ते वडनेर खुर्द या रस्त्याचे कामासाठी निधी मिळण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. अंदाजे ११ किलोमीटर असलेल्या या रस्त्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे माध्यमातून काही भागासाठी या आधीच्या काळात डांबरीकरण झालेले आहे. परंतु, सद्यस्थित या रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने इजिमा १४० मध्ये असलेल्या पिंपरखेड ते वडनेर खुर्द या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण झाल्यास वाहतुकीसाठी आणि शालेय विद्यार्थी, प्रवाशी यांचेसाठी सोयीस्कर असलेला हा मार्ग तयार होणार असल्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे कामासाठी निधी मंजूर व्हावा, अशी आग्रही मागणी पिंपरखेड, चांडोह, जांबूत, फाकटे परिसरातील नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, या विकासकामांसाठी आपण राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचे माजी सैनिक बळवंत बोंबे यांनी सांगितले.

शिरुर तालुक्यात रस्ता दुरुस्तीसाठी तरुणांचे अनोखे आंदोलन, सहकाऱ्यांसह घेणार थेट जलसमाधी…?

न्हावरा फाटा ते चौफुला रस्त्यावर रस्ता रुंदीकरणासाठी झाडांची कत्तल

शिक्रापूर पाबळ रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

जलजीवन योजनेच्या पाईपलाईनच्या कामामुळे त्या रस्त्याची ठेकेदाराने लावली वाट

पुणे नगर महामार्गावरील अपघात रोखण्यास उपाययोजना करा

वाघोली ते शिरुर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याचे काम सुरु होणार….