crime

कोंढापुरीत दहशत माजवत लुटमार करणाऱ्या चौघांवर गुन्हे

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथे रात्रीच्या सुमारास दहशत माजवून नागरिकांना मारहाण करुन लुटमार करणाऱ्या चोघांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून आदित्य विकास पंचमुख, रमाकांत पगारे, अलोक ढसाळ व विक्की खराडे असे शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेल्या आरोपींची नावे आहे.

कोंढापुरी (ता. शिरुर) येथे 15 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास काही युवकांनी दहशत निर्माण करुन एका वयस्कर व्यक्तीला मारहाण करत दिसेल त्या लोकांना मारहाण करत होते. काही वेळाने त्यांनी सचिन बनसोड यांना शिवीगाळ, दमदाटी करुन दगडाने मारहाण करत बनसोड यांच्या खिशातील पैसे काढून घेतले.

यावेळी मारहाण करणाऱ्या युवकांच्या दहशतीने शेजारील सर्व दुकानदारांनी त्यांची दुकाने देखील बंद केले, त्यांनतर बनसोड हे घरी जात असताना देखील सर्व युवकांनी बनसोड यांना पुन्हा मारहाण करत दमदाटी केली. त्यानंतर सचिन बनसोड यांनी हॉस्पिटल मध्ये उपचार घेतले. तसेच त्यांच्या मित्र परिवाराने त्यांना धीर दिला.

याबाबत सचिन रामदास बनसोड (वय २७) रा. कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. पिंपळा ता. मालेगाव जि. वाशीम यांनी शिक्रापूर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आदित्य विकास पंचमुख रा. कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे, रमाकांत पगारे, अलोक ढसाळ, विक्की खराडे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे.