केंदूरच्या सत्तर विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला परीक्षेतील यश

शिरूर तालुका

३२ विद्यार्थी अ, २९ विद्यार्थी ब तर ९ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा शासकीय रेखाकला एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून 32 विद्यार्थ्यांनी अ श्रेणीत तर 29 विद्यार्थ्यांनी ब श्रेणीत आणि 9 विद्यार्थ्यांनी क श्रेणीत यश संपादित केले असल्याची माहिती प्राचार्य प्राचार्य अनिल साकोरे व कलाशिक्षक संजय जोहरे यांनी दिली आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झाला विद्यालयातील प्रतिक्षा भोसुरे, सृष्टी भोसुरे, यशराज भोसुरे, प्रथमेश गोरे, साक्षी जाधव, सानिका जाधव, वैष्णवी लोखंडे, यशराज पऱ्हाड, स्मिता रामाने, पायल पऱ्हाड, पूर्वा राऊत, ज्ञानेश्वरी साकोरे, समिक्षा साकोरे, साकोरे समृद्धी, सानिध्य साकोरे, सानिका साकोरे, सार्थक साकोरे, श्रावणी साकोरे, तन्मय साकोरे, अनन्या सुक्रे, श्रावणी सुक्रे, स्वराज सुक्रे, पायल ताठे, तेजस्विनी ताठे, अन्वयी थिटे, प्राची थिटे, सम्राट थिटे, सिद्धार्थ थिटे, विपूल थिटे, समिक्षा वाघ, संस्कृती वाघ, समिक्षा वाघमारे या विद्यार्थ्यांनी अ श्रेणीत तर हर्षराज भोसुरे, ईश्वरी गाडेकर, राजश्री गायकवाड, अनिकेत गावडे, तन्वी गावडे, अथर्व होले, मुसरत शेख, समर्थ पऱ्हाड, सोहम पाटील, मानसी साकोरे, प्रिती साकोरे, श्रावणी साकोरे, वैष्णवी साकोरे, तनुजा साकोरे, यश साकोरे, तनिष्का शेंडकर, अपेक्षा सुक्रे, चेतन सुक्रे, जान्हवी सुक्रे, प्रियंका सुक्रे, संचिता सुक्रे, श्रावणी सुक्रे, प्रणव ताथवडे, चेतन ताठे, यश ताठे, आरती थिटे, आदिती वाघ, श्रावणी वाघमारे, बासरी वाजे यांनी ब श्रेणीत तसेच तुषार जाधव, अमृता नवले, कार्तिक साकोरे, कोमल साकोरे, वर्षा शिंदे, समीक्षा सुक्रे, समृद्धी सुक्रे, आदित्य ताठे व आयुष थिटे या 9 विद्यार्थ्यांनी क श्रेणीत यश संपादित केले.

सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संजय जोहरे यांनी मार्गदर्शन केले असून सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य अनिल साकोरे, सरपंच सूर्यकांत थिटे, माजी सभापती सदाशिवराव थिटे, रामशेठ साकोरे, शाळा समितीचे उपाध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड, भाऊसाहेब थिटे, विलास वाघ यांनी अभिनंदन केले आहे.