शिक्रापूर (शेरखान शेख: जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका पोल्ट्रीवर जात पोल्ट्री कामगारांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक नागेश अनिल खळदकर, विक्रम खंडेराव उमाप, आबा खंडेराव उमाप यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील बबन उमाप यांच्या पोल्ट्री वरील कामगार पोल्ट्रीचे शेडमध्ये झोपलेले असताना नागेश खळदकर व त्याच्या 2 साथीदारांनी पोल्ट्रीमध्ये जात तेथील चंद्रशेखर सिंग व सत्यनाम प्रसाद या दोघा कामगारांना शिवीगाळ दमदाटी करत आमच्याकडील काम सोडून इकडे आलात का, असे म्हणून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बबन उमाप व अन्य कामगार त्यांना सोडवत असताना कळतकरवा आदींनी यांना लय माज आला आहे. आधी आमच्याकडे कामाला होते यांना मारुन टाकतो, असे म्हणत बेदम मारहाण केली.
याबाबत बबन सहादू उमाप (वय ६५) रा. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक नागेश अनिल खळदकर, विक्रम खंडेराव उमाप, आबा खंडेराव उमाप रा. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हडागळे हे करत आहे.