Shirur Police Station

शिरूरमध्ये नाकेबंदी दरम्यान मोटारीत आढळली लाखो रुपयांची रक्कम…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत सतरा कमान पुलाजवळ निवडणुकी करिता नाकेबंदी करणाऱ्या शिरूर पोलिस स्टेशनच्या पथकाला तपसणी करीत असताना एम जी ग्लोस्टर गाडी मध्ये ५१ लाख १६ हजार रुपये रक्कम मिळून आले आहेत, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीमुळे शिरूर 17 कमान पुलाजवळ 10 एप्रिल 2024 […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात भरदिवसा महिलेची सोन्याची पोत हिसकावली…

कवठे येमाई (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे पायी चाललेल्या महिलेला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवून तिच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून नेली. मंगळवारी (ता. ९) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. द्वारकाबाई शंकर भोर (वय ५०, रा. गणेशनगर, इनामवस्ती, कवठे येमाई, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात एका मित्राचा विहिरीत बुडून तर दुसऱ्याने घेतला गळफास…

शिरूर (तेजस फडके) : धुलिवंदनाचा सण साजरा केल्यानंतर विहिरीवर पोहायला गेलेल्या एका युवकाचा कठड्यावरून तोल जाऊन विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला; तर या घटनेचा धसका घेऊन त्याच्या एका घाबरलेल्या मित्राने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या दोन्ही घटनांबाबत शिरूर पोलिसांनी स्वतंत्रपणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात जबरदस्तीने करायला लावली वेठबिगारी; महिलेने केला गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात जबरदस्तीने वेठबिगारी करावयास लावल्याने शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. एका ऊस ठेकेदाराने काही कामगार तीन महिन्याच्या कामासाठी ऊस तोडण्यासाठी चांडोह (ता. शिरूर) येथे आणले आहे. तीन महीने उलटल्यानंतरही कामगारांची ऊस तोडायची इच्छा नव्हती. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांची मानसिक तयारी नसताना जबरदस्तीने काम करायला […]

अधिक वाचा..
shirur-bus-fire

पुणे-नगर महामार्गावर शिरुर मध्ये एसटीच्या मालट्रकला आग अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पुणे रस्त्यावर शिरूरजवळील बोऱ्हाडे मळ्यात मालवाहतूक करणारी एसटी महामंडळाची मालट्रक (महाकार्गो बस) जळून पुर्णपणे खाक झाली असून, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहाणी झाली नाही. शुक्रवारी (ता. ९) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तीन तासांहून अधिक काळ या महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याने वाहनांची रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. पिंपरी-चिंचवड आगाराची ही महाकार्गो बस […]

अधिक वाचा..
shirur-police-station

सोशल मीडियावर तलवार दाखवली; शिरूर पोलिसांची धडक कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामध्ये तलवार दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर शिरूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याबाबतचा पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत. शिरूर परिसरात १) अनिकन अनिल पवार (रा. लाटेआळी, शिरूर), २) सुमित विजय जाधव (रा. लाटेआळी, शिरूर), ३) अजहर जमीन खान (रा. भाजीबाजार, शिरूर) हे सोशल मीडियावर तलवारीसह फोटो दाखवून तसेच स्वत जवळ […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला असून, त्याची ओळख पटवण्याचे आव्हान शिरूर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, पप्पू उर्फ विनोद शकर साठे (रा. इंद्रानगर, शिरूर, ता. शिरूर जि.पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे खबर दिली की, ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजण्याचे सुमारास ते त्यांच्या कामानिमित्त […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात इनाम जमिनीच्या विक्रीप्रकरणी २८ जणांवर गुन्हे; पाहा नावे…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गट नंबर ४२१ जमिनीच्या व्यवहारात जी जमिन इनाम वर्ग ६ ब (महारवतन) आहे. बोगस माणसे उभी करुन संगनमताने जमिन विक्री केल्याप्रकरणी २८ आरोपींवर फसवणूकप्रकरणी घोडनदी न्यायालयाच्या १५६/३ आदेशानुसार शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अलका धोंडीराम ऊर्फ नितीन कांबळे यांनी घोडनदी न्यायालयात फिर्याद […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर शहरात रोड रॉबरी करणारी टोळी जेरबंद; गुन्हे उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात रोड रॉबरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपी सध्या पोलिस कोठडी रिमांड मध्ये असून, पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशन करत आहेत. शिरुर शहरात रात्रीच्या वेळी शहराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची जबर दस्तीने लुटमार करून मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्याबाबत पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण अंकित गोयल […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात अंकाऊंट साफ करणारा पोलिसांच्या जाळयात…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात वृद्ध नागरीकांना एटीएम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधत खाते रिकामा करणाऱ्या पोलिस नाईक नाथासाहेब जगताप यांच्या तत्परतेमुळे जाळ्यात अडकला आहे. शिरूर शहरात वृद्ध नागरीकांना एटीएम मशिनमध्ये पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधत हातचलाखीने कार्डची अदलाबदली करुन पासवर्ड माहिती करून अकांऊट साफ करण्याच्या घटना शिरूर तहसिल कार्यालयासमोरील […]

अधिक वाचा..