Accident

शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील वाजेवाडीजवळ अपघातात चालक ठार तर…

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर-चाकण रस्त्यावर वाहनांना ओहरटेक करणारी कार कंटेनर वर आदळून झालेल्या अपघातात कार चालक ठार होऊन आठ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. राहुल तेजराव हिवाळे असे चालकाचे नाव असून मयत चालकावर शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने तौकिर आलम हे शनिवारी (ता. २२) पहाटेच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील एम एच ४६ बि बी ३४३८ हा कंटेनर घेऊन चालले होते. समोरून वाहनांची रांग लागलेली असल्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला कंटेनर उभा केला. याचवेळी चाकण बाजूकडून भरधाव वेगाने एम एच ०७ क्यू ३६०० ही झायलो कार समोरील वाहनांना ओव्हरटेक करत आली. कार वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार तौकिर आलम यांच्या कंटेनर वर जोरात आदळली आणि मोठा अपघात झाला.

कार मधील चालक कार मध्येच अडकल्याची माहिती मिळतात शिक्रापूर पोलिस स्टेशनचे अपघात मदत पथकातील पोलिस नाईक राकेश मळेकर, लखन शिरसकर यांचे स्थानिक नागरिक स्वप्नील शेळके, कानिफ मांजरे, आबा मांजरे, अतुल मांजरे, उमेश वाजे, रामदास मांजरे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कार मधील जखमींना कार मधून बाहेर काढून उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान कारचालक राहुल तेजराव हिवाळे (वय ४० वर्षे रा. कोल्हापूर पोस्ट मोहोरा ता. जाफराबाद जि. जालना) त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. कार मधील आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. घडलेल्या घटनेबाबत कंटेनर चालक तौकिर परवेज आलम (वय २२ वर्षे रा. कळंबोली नवी मुंबई, मूळ रा. चंपारन रामगडवा जि. मुतियारी बिहार) याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी मयत कार चालक राहुल तेजराव हिवाळे (वय ४० वर्षे रा. कोल्हापूर पोस्ट मोहोरा ता. जाफराबाद जि. जालना) याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पवार हे करत आहेत.