शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम नॉनवोवेनस इंटीरीयर्स प्रायवेट लिमिटेड या कंपनीच्या शेडमधील तांबे, कॉपर धातूच्या केबल सह आदी साहित्यांच्या तब्बल चार लाख सत्त्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम नॉनवोवेनस इंटीरीयर्स प्रायवेट लिमिटेड या कंपनीच्या दुसऱ्या शेडचे काम सुरु आहे. सदर ठिकाणी मशिनरी तसेच मशिनरीचे साहित्य आणून ठेवण्यात आलेले आहे. १८ ऑक्टोबर रोजी कंपनीतील कामगार काम करुन घरी गेले दुसऱ्या दिवशी पुन्हा काम करण्यासाठी आले असता त्यांना मशिनरी जवळील महागड्या तांबे, कॉपर धातूंच्या केबल, मीटर यांसह आदी साहित्य नाही. कंपनीत पाहणी केली असता सदर साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
याबाबत एम नॉनवोवेनस इंटीरीयर्स प्रायवेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक सचिन बाबुराव शिर्के (वय ३७ वर्षे रा. हिवरे रोड शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहेत.