शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावातुन एका दुचाकीची चोरी झाली असुन दुचाकी चोरी करताना अज्ञात चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याबाबत धनंजय यमराज काळे (वय ४६) रा.निमोणे, ता.शिरुर, जि.पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २ मे २०२५ रोजी मध्यरात्री १:१५ च्या सुमारास निमोणे येथील धनंजय काळे यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत उभी असलेली एक हिरो कंपनीची काळ्या रंगाची सिल्वर पट्टा असलेली स्प्लेंडर मोटारसायकलचे (एम एच १२ एस एम ९४४२ ) लॉक एका अज्ञात इसमाने कशाच्या तरी साह्याने तोडून दुचाकी चोरुन नेली आहे. हा सर्व प्रकार घराच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार प्रताप टेंगले हे करत आहेत.