रांजणगाव MIDC तील फियाट कंपनीतुन 8 लाख 40 हजार रुपयांच्या गाडीच्या पार्टची चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील फियाट कंपनीतील सायलेन्सर EURO 6 B यामधील हॉट एन्ड सी पी एल या पार्ट मधील एकून 140 सायलेन्सर कट करुन त्यामधुन एकुन 8 लाख 40 हजार रुपये किंमतीचे पार्ट काढुन कंपनीच्या बाहेर नेऊन विक्री केली असल्याचे उघडकीस आल्याने याबाबत फियाट कंपनीचे सिक्युरीटी […]

अधिक वाचा..

चोरी करून चालवलेले नदीवरील बंधाऱ्याचे ढापे वडनेर ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले… 

शिरूर (अरुणकुमार मोटे): पावसाळा सुरू होत आहे. यामुळे नदीवरील बंधाऱ्यातील ढापे काढून ठेवण्यात आले होते. आज शनिवार (दि. १७) रोजी पहाटे एक -दीडच्या सुमारास हे ढापे चार-पाच जणांनी टेम्पोमध्ये भरून चोरी करुन घेऊन जात होते. अचानक नाथा शंकर निचित यांच्याकडे मजुरी करत असणाऱ्या मजुरास जाग आली. बाहेर काहीतरी वाजते याचा कानोसा घेत नाथा निचित यांना […]

अधिक वाचा..

सणसवाडीतून चक्क चारचाकी कार चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) सह परिसरात वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना आता चक्क येथील एका इसमाची चारचाकी कार चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने परिसरात खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्रीनिवास दरेकर यांनी त्यांची एम एच १२ आर टी ७१०२ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील करडे येथुन दोन खिल्लारी बैलांची चोरी

निमोणे (तेजस फडके): करडे (ता. शिरुर) येथुन रविवार (दि 21) रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास गोठ्यातील दोन खिल्लारी बैलांची चोरी झाली असुन याबाबत संदीप देवराम जाधव (वय 38 ) सध्या रा करडे, (ता. शिरुर), जि. पुणे यांनी याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करडे येथील संदीप जाधव यांच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात चोवीस तासात दुसरा दरोडा…

बेट भागातील पिंपरखेडमध्ये दरोडा टाकत 5 लाख 87 हजार रुपयांची चोरी शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील दरोड्यांचे सत्र थांबत नसुन तर्डोबाची वाडी येथील गोरेमळा येथे मंगळवार (दि 16) रोजी रात्री 11 च्या सुमारास चोरट्यानी दरोडा टाकुन रोख रक्कम, सोने व इतर वस्तूंसह 3 लाख 22 हजारांचा ऐवज चोरीला गेलेला असतानाच गुरुवार (दि 18) रोजी पहाटे […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांना चोऱ्या रोखण्यात अपयश, तर्डोबाचीवाडी येथे घरफोडी करुन 3 लाख 22 हजारांची चोरी

शिरुर (तेजस फडके): गेल्या दिड वर्षात शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या अनेक गुन्ह्यांची उकलं करण्यात शिरुर पोलिसांना अपयश आलेले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारी वाढतं आहे. शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तर्डोबाची वाडी येथे सोन्याचे दागिने तसेच रोख रकमेसह 3 लाख 22 हजार रुपयांची चोरी झाली असुन शिरुर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असणार […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात दोन दिवसात दोन चारचाकी वाहनांची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी चोऱ्यांच्या घटना वारंवार घडत असताना आता चार चाकी वाहने चोरट्यांनी लक्ष केली असून नुकतेच एक इको व एक स्कोर्पिओ कार चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दत्तप्रसाद कॉलनी येथील कुंडलिक भोगाडे […]

अधिक वाचा..

सणसवाडीत डिकीतील मोबाईल व पाकीटसह दुचाकी चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील जॉन डियर कंपनीमध्ये कामाला आलेल्या कामगाराने दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेल्या मोबाईल व पाकीटसह दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील जॉन डियर कंपनीमध्ये शुभम साळुंके हा कामगार कामाला आलेला असताना त्याने कंपनीमध्ये मोबाईल बंदी असल्याने […]

अधिक वाचा..

पाबळमध्ये दिवसाढवळ्या तीन लाखांचे दागिने चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील कमळळोबाचा माळ परिसरात राहणारे व्यक्ती दुपारच्या सुमारास शेतात गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील तीन लाखांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील कमळळोबाचा माळ परिसरात राहणाऱ्या विमल चौधरी यांच्या शेतातील […]

अधिक वाचा..

सणसवाडीतील कंपनीतून हजारोंचे साहित्य चोरी

सणसवाडी (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरूर) येथील अंकिता ॲटो कोटर्स कंपनीतून हजारो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथील अंकिता ॲटो कोटर्स कंपनीत वाहनांच्या पार्टला पेंटिंग करण्याचे काम केले जात असल्याने कंपनीत पेंटिंग करण्यासाठी वेगवेगळे कलर तसेच त्यासाठी वापरले जाणारे […]

अधिक वाचा..