shirur-taluka-logo

Video: ऑक्टोपसने २० सेंकदात किती रंग बदलले पाहाच…

देश

नवी दिल्ली : सरडा आपल्या बचावासाठी सातत्याने रंग बदलतो हे आपल्याला माहिती आहे. पण, रंग बदलणाऱया ऑक्टोपसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

ऑक्टोपसचा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होत आहेत. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, ऑक्टोपस जातो तिथं तिथं त्या ठिकाणानुसार तो आपला रंग बदलो. शेवटी तो एका खडकाजवळ जातो आणि त्या खडकाप्रमाणेच होतो. २० सेकंदात ऑक्टोपसने अनेकदा रंग बदलला आहे. फक्त रंगच नव्हे तर त्याचं रूपही बदलताना दिसत आहे. @wonderofscience ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दरम्यान, एका ऑक्टोपसचा व्हिडीओ यापूर्वीही व्हायरल झाला होता. Buitengebieden ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. हा ऑक्टोपस झोपेत आपला रंग बदलताना दिसला. सुरुवातीला हा ऑक्टोपस पांढराशुभ्र होता. त्यानंतर हळूहळू त्याचा रंग पिवळा होतो. मध्येच हिरवा होतो. पाहता पाहता हा पांढरा ऑक्टोपस कलरफूल बनतो. फक्त रंगच नाही तर ऑक्टोपस आपला आकारही बदलताना दिसतो आहे. मध्येच त्याच्या शरीरावर स्पाइक म्हणजे काट्यासारखी रचना झाल्याचेही दिसले.