करंदीत कृषीदुतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शिरूर तालुका

शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी या विद्यालयातील कृषीदुतांनी कृषी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बीज उत्पादन क्षमता यांचे प्रात्यक्षिके दाखवत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

करंदी (ता. शिरुर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी या विद्यालयातील कृषीदुत कृषीदूत संग्राम गुंड, यश भवारी, शुभम काटे, पियुष माळी, मंदार गोंदकर, अभिषेक सातपुते या कृषीदुतांनी कृषी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बीज उत्पादन क्षमता तसेच बोर्डो मिश्रण चे योग्य प्रमाण व वापर यांची माहिती देत प्रात्यक्षिक करुन दाखवले.

unique international school
unique international school

यावेळी सरपंच सोनाली ढोकले, उपसरपंच पांडुरंग ढोकले, कृषी सहाय्यक सारिका काळे, ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे, ग्रंथपाल समीर पंचमुख यांसह आदी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बीज प्रक्रिया व माती परीक्षण ही काळाची गरज आहे, तसेच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या अभावामुळे पिकांवर होणारे परिणाम टाळाता यावे यासंदर्भात देखील कृषीदूतांद्वारे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आल्याने सरपंच सोनाली ढोकले यांनी कृषीदुतांचे आभार मानले.