shirur-taluka-logo

कायद्यांचे शिक्षण महत्वाचेच!

थेट गावातून महाराष्ट्र

कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावं लागलं, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी याच वकीलमंडळींची मदत घ्यावी लागते. म्हणूनच आज कायद्याचा अभ्यास केलेल्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी निर्माण झालेल्या पाहायला मिळतात.

कायदेशीर प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा न्यायालयापुढे आपलं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती ही अर्थातच वकील असते. कायद्याच्या क्षेत्रात काम करताना वकिलाकडे कोणत्या ना कोणत्या क्षेत्राचा खास अभ्यास असणं गरजेचं असतं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी एखाद्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करायला हवं. फौजदारी, सायबर, प्रशासकीय, मानव अधिकार, संवैधानिक, कौटुंबिक, कॉर्पोरेट, टॅक्सेशन, आंतरराष्ट्रीय, व्यापार, लेबर, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, पेटंट आदींपैकी एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून स्पेशलायझेशन करता येईल. वकील म्हणून काम करताना स्टेट सेंट्रल बार काऊन्सिलकडे नावनोंदणी करून मान्यता मिळवावी लागते. उच्च शिक्षण घेतल्यास या शाळांमध्ये समन्वयक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्रकल्प संचालक, यासारखी पदे मिळू शकतात. कायद्याचं शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहे.

कायद्याचं शिक्षण या यंत्राचा उपयोग करून आपण आयुष्यात खूप काही मिळवू शकतो. कायद्याच्या शिक्षणाचा स्तर लोकांचा सामाजिक आणि कौटुंबिक आदर वाढतो व स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात मदत करतो. शिक्षणाचा कालावधी प्रत्येकासाठी सामाजिक आणि व्यक्तिगत रुपाने महत्त्वपूर्ण वेळ असतो. आपल्या उच्च शिक्षणातून समाजाला आपली मदत व्हावी या उद्देशाने प्रत्यकाने स्वतः शिक्षण घेऊन लोकांना कसा मदत करता येईल ह्याचा सुद्धा विचार करावा.

कायदे क्षेत्रातील पदवी मिळवायची तर लॉ कोर्स करायला हवा. यासाठी विद्यार्थ्यांकडे दोन पर्याय आहेत. LLB कोर्स चे दोन प्रकार असतात एक 5 वर्षाचा आणि दुसरा 3 वर्षाचा. जर तुम्ही 12 वी नंतर सरळ कायद्यांचे शिक्षण प्राप्त करू इच्छिता तर तुम्हाला पाच वर्षाचा BA LLB कोर्स करावा लागेल. याशिवाय जर तुम्ही 3 वर्षाचा LLB कोर्स करू इच्छिता तर त्यासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण करावे लागेल. 12 वी नंतर कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा-CET द्यावी लागते. CET परीक्षा देऊन तुम्ही BA LLBसाठी LAW कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात.  लॉ करण्यासाठी ज्यांना CET चे व इतर कायदेशीर मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी कस्तुरी शिक्षण संस्था स्कूल ऑफ लॉ  फोन करून अधिक माहिती मिळवू शकता.
फोन. नंबर : 9552679339,7057152334

– डॉ. सपना सुकृत देव, drsapnasukrutdeo@gmail.co
उपप्राचार्य, कस्तुरी शिक्षण संस्था, स्कूल ऑफ लॉ, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे.