समृद्धी मार्गावर 100 दिवसात 900 अपघात तर 31 जणांचा मृत्यू…

मुख्य बातम्या

समृद्धी महामार्ग की अपघातांचा सापळा…

औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते. हा महामार्ग सुरु होऊन आज 100 दिवस झाले. या कालावधीत महामार्गावर छोटे मोठे 900 अपघात झाले तर या अपघातामध्ये 31 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले.

धक्कदायक बाब म्हणजे 46 टक्के अपघात हे मेकँनिक ब्रेक डाऊन झाल्यामुळे झाल्याचं समोर आले आहे. तर 15 टक्के अपघात टायर पंक्चरमुळे झाल्यामुळे झाले. तर 12 टक्के अपघात टायर फुटल्याने झाले आहेत. तर काही अपघातामध्ये वन्यप्राण्यांनाही दुखापत झाली आहे. बहुतांश वन्यप्राण्यांना वाहनाची धडक लागल्याने त्यांचा जीवही गेला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वन्यप्राण्यांचा वावरबाबत निर्णय घेण्याची गरज आहे.

अपघात टाळण्यासाठी काय करायला हवं?

1) वेगाचे उल्लंघन करणार्या ,लेन शिस्त न पळणार्या, टायर बाबत माहिती साठी वाहन चालकासाठी 8 ठिकाणी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

2) रस्ता सुरक्षा बाबत माहिती देणारे फलक अधिक प्रमाणात लावणे

3) सर्वे टोल नाक्यावर PA system सुरू करणे करणे

4) truck चालकांची विश्रांतीची पार्किंग ची व्यवस्था निर्माण करणे

दुचाकीचा वावर…

समृद्धी महामार्गावर दुचाकीस्वार यांना परवानगी देण्यात आलेली नाही. मोठ्या गाड्यांच्या वेग पाहता या महामार्गावर दुचाकी चालवण्यास बंदी आहे. मात्र असे असतांना देखील या महामार्गावर अनेक ठिकाणी दुचाकीस्वार प्रवास करतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे देखील अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. अचानक दुचाकी समोर आल्यावर वेगावर नियंत्रण मिळवणे अवघड होत असल्याची तक्रारी देखील समोर येत आहेत.