अजित पवार यांनी ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानी गुढी उभारुन साजरा केला गुढी पाडवा

महाराष्ट्र

अजित पवार यांच्याकडून सर्वांना गुढीपाडव्याचा शुभेच्छा

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील ‘ देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी गुढी उभारली तसेच गुढीची सपत्नीक पूजा केली. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित सर्वांना तसेच राज्यातील नागरिकांना, महाराष्ट्रप्रेमी बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

“वसंतऋतुच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा, आलेलं नववर्ष, सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी, चैतन्य, उत्साह, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. जीवनातल्या आशा-आकांक्षा, मनातली स्वप्ने पूर्ण होवोत. नवनिर्मितीच्या प्रयत्नांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो. जीवनातली यशाची गुढी आभाळात उंच जावो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्रवासियांना, मराठीप्रेमी बांधवांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी संस्कृतीत गुढीपाडव्याचं महत्वं अनन्यसाधारण आहे. घरोघरी गुढी उभारुन, गावात, शहरात शोभायात्रा काढून गुढीपाडवा साजरा केला जातो, नववर्षाचं स्वागत केलं जातं. मावळत्या वर्षातील आनंददायी आठवणी सोबत घेऊन नववर्षाचं स्वागत करुया. एकजूट होऊन सुखी, समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवूया, असं आवाहनही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुभेच्छा संदेशात केल आहे.