रामलिंग महिला उन्नती तसेच स्वर्गीय गणेश गौतम घावटे युवा मंचच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार वितरण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग (ता. शिरुर) येथे स्वर्गीय गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच आणि रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. या नवरात्र उत्सवामध्ये विविध उपक्रम साजरे करण्यात आले. त्यामध्ये संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा ,लिंबू चमचा स्पर्धा, वेशभुषा स्पर्धा, डान्स स्पर्धा, BMIचेकअप, कॅन्सर तपासणी, गौरव नारीशक्तीचा, होम मिनिस्टर, दांडिया असे विविध उपक्रम घेण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्कार आणि बक्षीस वितरण करण्यात आले.

 

यावेळी रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, स्वर्गीय गणेश गौतम घावटे पाटील युवा मंचचे अध्यक्ष मंगेश घावटे, शिरुर नगरपालिकेच्या नगरसेविका सुवर्णा लोळगे, अलका सरोदे, उर्मिला फलके, महीला दक्षता समिती सदस्या श्रुतिका झांबरे, राणी शिंदे, अ‍ॅड सरिता खेडकर, अ‍ॅड अमृता खेडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनंदा घावटे, हिराबाई जामदार, ओन्ली वूमन जिमच्या प्रिया बिरादार, सुजाता पाटील, मीरा परदेशी, आधार छाया फाऊंडेशन अध्यक्षा सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, डॉ वैशाली साखरे, ममता गोसावी, रोहिणी जामदार, स्नेहा जामदार, गायत्री डींगरे, दिपाली आंबरे, आशा पाचंगे, शिला पाचंगे, राजश्री ढमढेरे, शबाना शेख आदी महिला मान्यवर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

 

यावेळी आदर्श गृहिणी भारती खुडे / चांदणे, आदर्श उद्योजिका वैशाली गायकवाड, आदर्श महिला पत्रकार दिपाली काळे, आदर्श डॉक्टर डॉ स्मिता बोरा, आदर्श समाजसेविका शोभना पाचंगे, आदर्श शिक्षिका कुसुम लांघी, आदर्श नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे, आदर्श कलाक्षेत्र डॉ सुनीता पोटे, आदर्श वकील सुवर्णा वाघमारे या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सर्व कर्तृत्ववान महिलांना शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांचे आभार संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मानले.