शिरुरमध्ये संजय गांधी प्रकरणांसाठी चक्क बनावट ऊत्पन्न दाखला आणि सही, शिक्क्याचा वापर

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील अंपग, विधवा तसेच जेष्ठ व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार योजना मोठया प्रमाणात राबवली जात आहे. यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला तहसिलदारांचा उप्तन्नाचा दाखला व प्रकरणावर तलाठयाचा सही व शिक्का घ्यावा लागत आहे. परंतु शिरुर तालुक्यातील एका ठगाने तहसिलदारांच्या उत्पन्नाच्या दाखल्यात फेरफार करत करून अनेक बोगस उत्पन्नाचे दाखले दिल्याचे निदर्शनात आले आहे. तसेच शिरूर तालुक्यातील अनेक तलाठ्यांचे बनावट शिक्के बनवून त्यांच्या खोट्या सहया केल्याचेही तलाठी आबासाहेब मोरे , मंडल आधिकारी माधुरी बागले यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणावर साक्षीदांराच्या खोट्या सह्या केल्याचेही निदर्शनास आले आहे.

त्यामुळे बनावट दाखले, शिक्के आणि सह्या करणाऱ्या विरुद्ध तातडीने तपासणी करुन तहसिल कार्यालयाने गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली असून या ठगाने अनेक नागरीकांना आर्थिक भुर्दंड देवून तालुक्यातीत शेकडो दाखले बनावट दिल्याची चर्चा तालुकाभर होत आहे. एवढी माहीती असताना महसुल विभाग मुग गिळून गप्प का…? आता या प्रकरणी कधी कारवाई होणार…? की महसूल विभाग या ठगाला पाठीशी घालणार याकडे शिरुरच्या जनतेचे लक्ष लागले आहे.

शिरुर तहसिलच्या सेतू कार्यालयातून जेष्ठ नागरीक व अपंगाना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेसाठी सामाजिक बांधिलकी म्हणूण लागणारे प्रतिज्ञापत्र आणि उत्पनाचे दाखले मोफत दिले जात असतानाही या महाभागाने बनावट दारवले तयार केले आहे. तसेच या प्रकरणासाठी खोटे शिक्के बनवणाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. याविषयी शिरुरचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.