चेहऱ्यावर डाग, पिंपल्स, सुरकुत्या असतील तर करा हे घरगुती उपाय

आरोग्य

1) ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी १ चमचा दही, १ चमचा मसूरडाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे.

2) पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे.

3) ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा.

4) जायफळ पाण्यात उगळून पिंपल्स व डोळ्याभोवती काळी वर्तुळ असेल तर लावावे.

5) टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग व वर्तुळे कमी होतात.

6) पिंपल्स जास्त असेल तर कोबी किसुन त्यात जायफळ पेस्ट मिसळुन जाडसर भार चेहऱ्यावर देणे.

7) चेहऱ्यावर पिंपल्स व पिंपल्सचे डाग असेल तर तुळशीच्या पानाचा रस १ चमचा, १ चमचा पुदीन्याचा रस व थोडे हळद पेस्ट करून हे मिश्रण पाण्यात करुन घेणे.

8) चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर मेरी गोल्ड जेलने मसाज करावा.

9) जांभळीची बी पिंपल्सवर लावणे.

10) चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर चेहऱ्यावर बाजरीच्या पिठाचा लेप देणे. चेहरा निखरतो.

11) चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर सफरचंद किसून त्यात एक चमचा कच्चे दुध टाकुन व ही पेस्ट चेहऱ्यावर लावणे.

12) चेहरा स्वच्छ व चमकदार होण्यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण, १० मिनिट पाण्यात भिजवून चेहऱ्यावर लेप देणे.

13) चेहऱ्यावर सुरुकुत्या असेल तर त्यावर केशर व बदामची कच्च्या दुधात पेस्ट करुन लावणे.

14) चेहरयावरील सुरकुत्या घालवण्यासाठी तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याचा रस कोमट करून तो रात्री झोपताना चेहर्‍यावर लावावा. सकाळी चेहरा स्वच्छ धुऊन खोबरेल तेल चोळावे. या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते.

15) कोमल त्वचेसाठी दोन चमचे दूध किंवा सायीमध्ये लिंबाचा रस पिळून त्याला तोंड आणि मानेवर थोडा वेळ लावावे, आणि थोड्या वेळाने धुऊन टाकावे. चेहर्‍याला ब्लीच केल्यासारखे वाटेल. त्यामुळे त्वचा कोमल आणि तजेलदार बनेल.

16) पुटकुळ्या घालविण्यासाठी कारल्याची साल चेहर्‍यावर चोळावी. यामुळे पुटकुळ्या, काळी वर्तुळे, काळे डाग निघण्यास मदत होईल. हा उपाय साधारणतः तीन ते पाच दिवस करून पाहावा.

17) सावळेपणा दूर करण्यासाठी आजकाल बाजारात अनेक प्रकारची क्रीम्स उपलब्ध आहेत. पण आपण जर घरच्या घरीच काही उपाय केले तर त्वचेचा सावळेपणा काही अंशी दूर होऊ शकतो. एक बादली पाण्यात एका लिंबाचा रस टाकावा. या पाण्याने स्नान करण्याने त्वचेची बंद रंध्रे खुलतात आणि त्वचा उजळते. हिवाळ्यात हा प्रयोग करताना गरम पाणी घ्यावे आणि उन्हाळ्यात थंड पाणी घ्यावे. ‍सावळेपणा दूर करण्यासाठी आवळा चूर्णात थोडं पाणी मिसळून ती पेस्ट चेहर्‍यावर व पूर्ण शरीरावर लावावी.

18) त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आपण आठवड्यातून दोन/तीन वेळा आपण हा उपाय करू शकतो. बेसन, हळद आणि दूध मिक्स करून, त्यात साधे मीठ टाकावे आणि कोणत्याही तेलाचे 5/7 थेंब टाकावे. मिश्रण एकजीव करून चेहर्‍याला व मानेला लावावे. पेस्ट वाळल्यानंतर 10-15 मिनिटांनी काढून टाकावी.

(सोशल मीडियावरुन साभार)