कारेगाव (तेजस फडके) देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत (Ranjangaon MIDC) येणार असुन येथील महाराष्ट्र इन्व्हारो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतुन सोडण्यात येणाऱ्या केमिकल युक्त दुषित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतीची पाहणी व शेतकऱ्यांची व्यथा समजुन घेण्यासाठी बुधवार (दि २३) रोजी सकाळी १० वाजता निमगाव भोगी येथे येणार आहेत.
निमगाव भोगी गावच्या सरपंच ज्योती सांबारे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले कि, आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हारो पॉवर लिमिटेड या कंपनीतुन केमिकलयुक्त दुषित पाणी सोडण्यात येत असल्यामुळे निमगाव भोगी गावच्या हद्दीतील जमीन नापीक झाली आहे. याचं संदर्भात देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार हे प्रत्यक्षात शेतकऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत. त्यामुळे निमगाव भोगी सह पंचक्रोशीतील सर्व बाधित गावातील शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहनही सरपंच ज्योती सांबारे यांनी सर्वांना केले आहे.
यावेळी शिरुर लोकसभा मतदार संघांचे खासदार अमोल कोल्हे, नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, माजी आमदार अशोक पवार, भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
MEPL च्या विरोधात निमगाव भोगीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे दोन दिवस धरणे आंदोलन
त्यापेक्षा आम्हालाच विष घालुन मारुन टाका निमगाव भोगी ग्रामस्थांचा आक्रोश
MEPL च्या विरोधात खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याप्रमाणे विधानसभेत आवाज उठवणार; अॅड अशोक पवार