shirur-kurshi-utpanna-bajar samiti

मोठा निर्णय! शिरूर बाजार समिती निवडणुकीला ब्रेक…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (तेजस फडके): शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना उच्च न्यायालयाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून ती नव्याने राबविण्याचे आदेश दिल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मतदार यादीतील त्रुटी आणि मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

निवडणुकीपूर्वीच मतदार पात्रतेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ७८ ग्रामपंचायतींतील ७२९ सदस्यांना मतदार आणि उमेदवार म्हणून अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे संबंधित सदस्यांमध्ये तीव्र नाराजी होती. या निर्णयाविरोधात माजी आमदार अशोक पवार यांच्या पुढाकारातून शिक्रापूरचे माजी सरपंच मयूर करंजे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या निवडणुकीचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

उच्च न्यायालयाने आता विद्यमान मतदार यादी बेकायदेशीर ठरवत ती रद्द केली असून, नव्याने पात्र मतदारांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर संपूर्ण निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करून मतदानाची प्रक्रिया पुन्हा पार पडणार आहे.

या निर्णयामुळे शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आलेल्या निवडणुकीला अचानक ब्रेक लागल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता सर्वांचे लक्ष नव्या मतदार यादीसह जाहीर होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमाकडे लागले आहे.

लोकशाहीचा हा मोठा विजय…
“शिरूर बाजार समितीची निवडणूक ही संपूर्ण तालुक्याची असताना केवळ १८ ग्रामपंचायतींनाच मतदानाचा अधिकार देऊन ७८ ग्रामपंचायतींना वंचित ठेवणे हा लोकशाहीवरील अन्याय होता. या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली आणि आज आमच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता ७२९ ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा हक्क मिळणार असून, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे.”
– अशोक पवार, माजी आमदार

शिरुर बाजार समितीच्या उमेदवारीवरुन दिलीप हिंगे यांचा स्थानिक नेतृत्वावर अप्रत्यक्ष निशाणा

शिरुर बाजार समिती निवडणुक; अशोक पवारांवर टिका करणाऱ्या माऊली कटकेंनी दिड वर्षात काय केले…?

शिरुर बाजार समितीची बाभुळसरमध्ये पुनरावृत्ती…? सत्ताधाऱ्यांना धक्का देत उपसरपंचपदी गणेश वाळके

शिरुर; ‘हेड टू टेल’ आणि ‘टेल टू हेड’ समजायला विद्यमान आमदारांना अजुन काही दिवस लागतील”; अशोक पवार

आमदाबाद येथील नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत