शिरुर शहरातील अतिक्रमण नगर परीषदेने न काढल्याने घोगरे यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील सिटी सर्वे नं २१३/६ गुजर मळा (निर्माण प्लाझा) येथील अनाधिकृत बांधकाम त्वरित पाडावे तसेच पुणे – नगर रोड वरील टपरीधारकांना ज्या नोटीसा दिल्या आहेत त्या तात्काळ मागे घ्याव्यात व टपरी धारकांना एकाच ठिकाणी व्यावसायासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी या मागणी साठी मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांनी आत्म दहनाचा इशारा दिला आहे.

या संदर्भातील निवेदन मुख्याधिकारी यांना दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि, शिरुर शहरातील गुजर मळा (निर्माण प्लाझा) येथील सिटी सर्वे नं २१३/६ येथे अनाधिकृत बांधकाम मोठया प्रमाणावर झाले असुन या संदर्भात नगरपरिषदेने संबंधित व्यक्तीस २०१७ ते २०२२ पर्यंत अनेक वेळा ५३, ५४, ५६ च्या अशा अनेक नोटीसा काढल्या मात्र नगरपरिषदेकडुन हे अतिक्रमण काढण्यासाठी कुठलेही प्रयत्न झाले नसल्याचा आरोप घोगरे यांनी निवेदनात केला आहे.

शिरुर शहरातील गोरगरिबांना एक न्याय व प्रस्थापीतांना वेगळा न्याय का? असा प्रश्न घोगरे यांनी विचारत आत्तापर्यंत नगरपरिषदेकडुन कुठलीही कारवाई व गुन्हा दाखल का केला नाही त्यामुळे (दि. २७) ऑक्टोबर रोजी नगरपरिषद कार्यालया समोर आत्मदहन करण्यात येणार असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे .