केंदूर मध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिठाई वाटप

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील केंद्राई माता दुध संकलन केंद्र येथे दिवाळी निमित्त दुध उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व मिठाई वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आले असल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले.

केंदूर (ता. शिरुर) येथील केंद्राई माता दुध संकलन केंद्र येथे दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिठाई व बोनस वाटप प्रसंगी शिरुर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, सुनिल तांबे, पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे, पोलीस पाटील सुभाष साकोरे, केंद्राई माता दुध संकलन केंद्राचे अध्यक्ष बाळासाहेब साकोरे, माजी सरपंच तुकाराम थिटे यांसह आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गोमातेचे पूजन करुन तब्बल 150 दुध उत्पादक शेतकऱ्यांना 10 लाख 35 हजार रुपयांच्या बोनस सह मिठाई व आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले, तर दुध उत्पादक शेतकऱ्यांना फेटे बांधून सन्मानित करण्यात आले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ सुक्रे यांनी केले तर प्रास्ताविक संदीप सुक्रे यांनी केले आणि केंद्राई माता दुध संकलन केंद्राचे अध्यक्ष बाळासाहेब साकोरे यांनी आभार मानले.