शिरुर तालुक्यात सर्वात सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचन व लेखन करण्याच्या पद्धतीचा प्रा.शुभम थोरात यांनी लावला शोध…

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरूर) येथील रहीवाशी प्रा. शुभम थोरात यांनी इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करून जगातील सर्वात सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचन व लेखन करण्याच्या पद्धतीचा शोध लावला असून त्याचे स्वॉप्टवेअर जुन महिन्यात मुलांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्रभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुलांना इंग्रजी वाचन कसे करावे? इंग्रजी लेखन कसे करावे? याबद्दल सविस्तर माहिती कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. तसेच कोणत्याही शाळेमध्ये, खाजगी क्लासेसमध्ये शिकवले जात नाही. आजही सर्वत्र विद्यार्थ्यांकडून इंग्रजी शब्द हे पाठांतरच करुन घेतले जातात. विद्यार्थ्यांकडून आपण आयुष्यभर असेच शब्द पाठांतर करुन घेण्यापेक्षा अतिशय सोप्या पद्धतीचा शोध प्रा. थोरात यांनी लावला आहे.

विद्यार्थ्यांच्या बालमनाचा आपण पालक म्हणून कधीतरी विचार करून या महत्वाच्या समस्या लक्षात घेऊन इंग्रजी विषयाची असणारी भीती कमी करण्यासाठी आणि इंग्रजी वाचन व लेखन क्षमता विकसित करण्यासाठी SELF STUDY EDUCATION या जगातील सर्वात सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचन व लेखन करण्याच्या पद्धतीचा प्रा. शुभम थोरात यांनी शोध लावला आहे.

या पद्धतीमुळे एकही इंग्रजी स्पेलिंग व उच्चार पाठ न करता झटपट शास्रशुध्द, स्वयंअध्ययन पध्दतीने विद्यार्थी स्वतः इंग्रजी वाचन व लेखन करायला शिकणार आहेत. कोणीही न शिकवता देखील इंग्रजी वाचता व लिहिता येणार आहे आणि तेही कमीत कमी वेळेत व कमीत कमी श्रमात हे यांच्या किटचे खास वैशिट्य आहे. आजपर्यंत इतक्या सोप्या पध्दतीने आपण कोणीही इंग्रजी शिकला नसाल अशा “गुरुमंत्र” नावाच्या स्वयंअध्ययन पध्दतीने मुले इंग्रजी शिकणार आहेत.इंग्रजीचे उच्चार आणि स्पेलिंग सुधारण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना हे किट अत्यंत उपयोगी आहे.

आजपर्यंत आपण इंग्रजी शिकण्यासाठी अनेक वेगवेगळी पुस्तके, नोट्स, कोर्सेस, क्लासेस असे अनेक मार्ग अवलंबले. परंतु तरीसुद्धा इंग्रजी वाचन आणि लेखन करताना आजही अनेकांच्या चुका होतात. याचे प्रमुख कारण म्हणजे इंग्रजी विषयात जितके सखोल संशोधन व्हायला पाहिजे होते तेवढे झालेले नाही. परंतु SELF STUDY EDUCATION*ने तब्बल २० वर्ष मेहनत घेऊन असा एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे की ज्याचा वापर करून आपण इंग्रजीचा एकही शब्द, एकही स्पेलिंग, एकही उच्चार पाठांतर न करता, आपण अगदी 100% इंग्रजी वाचन व लेखन अचूक शिकणार आहात, असे प्रतिपादन प्रा.शुभम थोरात यांनी व्यक्त केले.