मांडवगण फराटा (संपत कारकुड) ग्रामपंचायत सादलगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण फराटा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात गावातील असंख्य महिलांनी व किशोरवयीन मुलींनी शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ नितीन फटाले यांनी सांगितले की, घरातील स्त्री सुरक्षित तर सर्व घर सुरक्षित, त्यासाठी महिलांची आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या शिबिरात आपण तो प्रयत्न करणार आहोत.
सादलगाव ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात महिलांची हिमोग्लोबिन, बी.पी शुगर, तसेच ई.सी.जी. मशीनद्वारे हृदयाची तपासणी करण्यात आली. किशोरवयीन मुलींना एक वर्षाचे सॅनिटरी पॅडचे वाटप तर कुपोषित बालकांना सकस आहाराचेही वाटप करण्यात आले. याचा सर्व खर्च ग्रामपंचात सादलगाव यांच्याकडुन करण्यात आला तर आरोग्य उपकरणे व वैद्यकीय सेवा आरोग्य केंद्र मांडवगण फराटा यांनी पुरवली होती.
यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी जे. के. लहामटे, विस्तार अधिकारी व्ही .एल. गाडीलकर तसेच गावचे नवनिर्वाचित सरपंच खंडेराव मिठे, माजी सरपंच हरीअण्णा चांदगुडे, अविनाश पवार ,संतोष जगताप, कांतीलाल ,होळकर निवृत्त शिक्षक महादेव होळकर, सिताराम जाधव गावच्या ग्रामसेविका डी बी झाडगे, गावच्या महिला उपसरपंच विद्या काशीद, सदस्या निर्मला केसवड, मनीषा गायकवाड, वैशाली होळकर ,अश्विनी केसवड व असंख्य महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनेश होळकर तर आभार प्रदर्शन खंडेराव मिठे यांनी केले.
Video; रांजणगावमध्ये मोबाईल शॉपीमध्ये चोरीचा प्रयत्न अयशस्वी; गॅस एजन्सीत १५ हजारांची चोरी
Video; शिरुर महसूलचा वाळू माफियांना दणका; ६ बोटी व ८ फायबर जिलेटिनच्या साह्याने उध्वस्त
Video; महसुल दिनाच्या पुर्व संध्येला घोड धरणात महसूलने वाळूमाफियांच्या दोन यांत्रिक बोटी उडवल्या