शेतीक्षेत्र संकटात; पाण्याचा सामू (PH) असमतोल पिकांच्या उत्पादनावर घाला

मुख्य बातम्या शिरूर तालुका

मांडवगण फराटा (संपत कारकूड) शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा सामू (PH) असमतोल झाल्यामुळे पिकांच्या मुळांचे ७० ते ८०टक्के नुकसान होत असून त्यामुळे उत्पादनात मोठी घट होत आहे, अशी माहिती जलतज्ञ दत्तात्रय कोळेकर यांनी दिली.

 

सादलगाव येथे आयोजित शेतकरी कार्यशाळेत “क्षारपड जमीन व क्षारयुक्त पाणी” या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, शिरुर तालुक्यातील विविध भागांतील पाण्यात क्षारांचे प्रमाण धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. पिकांसाठी आवश्यक असलेला सामू ६. ५ ते ७ इतका असावा. मात्र सध्या तो ८ ते ९ इतका आढळत आहे. त्यामुळे कितीही खते टाकली तरी जमीन त्यांचे शोषण करत नाही व ती वाया जातात. परिणामी जमिनीत क्षारपड वाढते व पिकांच्या मुळ्या सडतात.

 

यावेळी कोळेकर यांनी शेतकऱ्यांना पाणी व मातीची तपासणी करुनच खतांचे प्रमाण ठरवण्याचा सल्ला दिला. तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करुन सेंद्रिय खतांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वतः तयार केलेला विशेष फॉर्म्युला वापरण्याचीही सूचना केली. या कार्यक्रमाला पुण्याचे आरोग्य सल्लागार जयवंत वाडेकर, निवृत्त सैनिक तुकाराम डफळ, तसेच सादलगाव व हंगेवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Video; शिरुर महसूलचा वाळू माफियांना दणका; ६ बोटी व ८ फायबर जिलेटिनच्या साह्याने उध्वस्त

Video; रांजणगावमध्ये मोबाईल शॉपीमध्ये चोरीचा प्रयत्न अयशस्वी; गॅस एजन्सीत १५ हजारांची चोरी

Video; महसुल दिनाच्या पुर्व संध्येला घोड धरणात महसूलने वाळूमाफियांच्या दोन यांत्रिक बोटी उडवल्या