chandan-sondekar-adhalrao Patil

चंदन सोंडेकर यांनी घेतली शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट; अन् तत्काळ पत्र…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेकजण जखमी झाले असून, नागरिक भयभीत आहेत. राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली व पत्र दिले.

चंदन सोंडेकर यांच्या विनंती पत्रावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना बिबट आपत्ती प्रवण क्षेत्रामध्ये (शिरुर – हवेलीतील) पिंपळे जगताप, वाजेवाडी या गावांचा समावेश करण्याबाबत पत्र जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी २६ जून २०२४ रोजी जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरुर तालुक्यातील २३३ गावांचा “बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र” यामधे समावेश केला होता. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी खासदार शिवाजीराव आढळराव यांची नुकतीच त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील पिंपळे जगताप व वाजेवाडी या गावांत बिबट्यांचा वावर असून त्यांपासून नागरिकांच्या व पशुधनाच्या जिवीतास धोका असूनही या गावांचा बिबट प्रवण क्षेत्रात जिल्हाधिकारी यांनी बिबट हल्ला घटना घडलेली गांव वगळली असल्याचे निदर्शनास आणून लक्ष घालण्याची विनंतीपत्र दिले होते. त्यावेळेस चंदन सोंडेकर यांच्यासोबत अरुण गिरे, मा. उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद, अनिल काशिद, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, पुणे, सुभाष जगताप, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळे जगताप, नवीन सोनवणे, व्हा. चेअरमन, विकास सोसायटी वाजेवाडी हे होते.

राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांच्या विनंती पत्रावर माजी खासदार आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना बिबट आपत्ती प्रवण क्षेत्रामधे (शिरुर-हवेलीतील) पिंपळे जगताप, वाजेवाडी या गावांचा समावेश करण्याबाबत पत्र नुकतेच दिले आहे.

दरम्यान, चंदन सोंडेकर हे आगामी शिरूर-हवेलीच्या विधानसभेसाठी (आमदारकी) इच्छुक असल्याने ते महायुतीच्या कार्यकर्त्यांना एक संध ठेवण्यास प्रयत्नशील आहे. पक्ष स्थापनेपासून २५ वर्ष ते राष्ट्रवादी पक्षात सक्रीय आहे. सन २०१९ ला ते अशोक पवार यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुक लढले होते. त्यांनी अशोक पवार, बाबुराव पाचर्णे यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकांचे मताधिक्य घेतले होते. फाटाफुटीनंतर अशोक पवार शरद पवार गटात गेल्यानंतर चंदन सोंडेकर अजितदादांचे नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादीत स्वगृही परतले. ते आता कार्यकर्त्यांच्या प्रशासकीय अडचणींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष घालण्याची विनंती करणार आहे.

शिरूर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आमदारकीचे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर यांनी घेतली भेट…

‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर

शिरूर तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला…

Video; शिरुर; बिबट्याची मादी कोंबडी खायला गेली अन खुराड्यात अडकली

शिरूर तालुक्यात बिबट्या आणि शेतकऱ्यामध्ये झाली झटापट…